Posts

Showing posts from November, 2022

बाबा

Image
 *बाबा* राहुल माझ्या स्वप्नांसाठी  स्वतःची स्वप्नं ते विसरले माझ्या वाट्यावरचे काटे ते कायमच उचलत आले काबाडकष्ट करुन त्यांनी घाम सतत गाळला भविष्याच्या फुलबाग माझा त्यांनीच की हो फुलवला खेळ गमतीजमती साठी ते मित्र जरी बनले अडचणीच्या प्रसंगी देवबाप्पाही तेच झाले चुकलो अनेकदा मी बाबांचे बोलही ऐकले माझ्या साठी अनेकदा मूक अश्रू ढाळलेलेही पाहिले आईने धरली सदा वेड्या मायेची ती छाया कुटुंबाला संपूर्ण माझ्या बाबांचाच भक्कम पाया बाबांचा अवतार जसा नारळ, काटेरी फणस ते खरे करारी चेहऱ्यावर राग जरी अंतरी काळजी, आपुलकीचे झरे सर्व संकटात आमच्या दारात उभे ते, जणू काही ढाल खंबीरपणाची त्यांच्या खरंच आहे हो कमाल आईसंगे मनमोकळे बोललो, हसलो रडलो बाबांसमोर मात्र सदा घुमाघुमाच राहिलो अंतरीची त्यांची माया कस्तुरी अत्तराचा जणू फाया दिसे वरुन काही नाही सुगंध पसरवी नुसती छाया बाबांसाठी वृद्धापकाळी बनेन का मी आधाराची काठी मनातला बाबा माझ्या होईन का माझ्या मुलासाठी ©राहुल लाळे 🌈

हर हर महादेव

Image
  # # HarHarMahadev *हर हर महादेव ..   हर हर ..* राहुल लाळे इतिहास हा आवडता विषय , त्यामुळे ऐतिहासिक पुस्तकं वाचण्याचा नाद लहानपणापासून - शिवाजी महाराज , मराठ्यांचा इतिहास तर जिव्हाळ्याचा विषय . बाबासाहेब पुरंदऱ्यांची शिवछत्रपतींवरची व्याख्यानमाला कमीत कमी दहावेळा  ऐकलीये आणि त्यांचं राजा शिवछत्रपतीं व रणजित देसाईंचं श्रीमान हा ग्रंथ अगणित वेळा वाचलाय अजूनही वाचतो. लहानपणी टीव्हीवर ( आता का लागत नाहीत ?) भालजी पेंढारकरांचे शिवकालीन सिनेमे आवर्जून पाहायचो - राजा शिवछत्रपतीं, नेताजी पालकर, बहिर्जी नाईक, मराठा तितुका मिळवावा, थोरातांची कमळा, धन्य ते संताजी धनाजी ... अनेक .. अगदी दादा कोंडकेंचा गनिमी कावा सुद्धा .. मध्ये अनेक वर्षे ऐतिहासिक सिनेमे निघालेच नाहीत . पण गेल्या काही वर्षात संजय लीला भन्साळी आणि आशुतोष गोवारीकर यांनी हिंदीत,आणि दिगपाल लांजेकरचे फर्जंद , फतेशिकस्त, पावनखिंड आणि शेरशिवराज, पानिपत, प्रसाद ओक चा हिरकणी, अजय देवगणचा तानाजी, नुकतेच प्रदर्शित झालेले प्रवीण तरडेंचा सरसेनापती हंबीरराव ,अमोल कोल्हेंचा शिवप्रताप गरुडझेप,  आणि अगदी ताजा...

मन

 *"मन"* मन म्हणजे काय हो ? ,  त्याला कोणी पाहिलं नाही ,  कसं असते ते माहीत नाही, पण त्याला खूप मान्सनमान असतो. कधी ते लिक्विड असतं,   "मन भरलं नाही" असं म्हणतो आपण,  कधी ते सॉलिड असतं, "मनावर खूप ओझं आहे",  कधी ते घर होतं, "मेरे मन में रहने वाली",  कधी ते तहानलेल असतं,  "मेरा मन तेरा प्यासा" ,  कोणी त्याला मोरा ची उपमा देतं, "मन मोराचा कसा पिसारा फुलला".  असं हे मन आयुष्य भर आपल्याला झूलवत ठेवतं ,  कधी स्वतःच्या मनाने तर कधी दुसऱ्या च्या मनाप्रमाणे आपण वागत असतो,   हे "मन" कधीच स्थिर का बरं नसतं ? ,  ते कधी प्रेयसी च्या तोंडातून मंदिर रूप धारण करतं  आणि ती म्हणते "मन में तुझे बिठाके ..." काही जण असतात की त्याच्या "मनात"काही रहात नाही तर काही "मन कवडे" असतात.   मन दिसत तर नाही ... पण त्याने ठरवले तर ते हरवून टाकतं  तर कधी शक्ती नसताना जिंकून ही देतं.  "मनात आणलं तर काहीही होऊ शकतं .."  जरी त्याला कोणी पाहिलेले नाही तरी ते जर चांगलं असलं तर आपण आनंदी राहतो ,  दुसऱ्या च भलं करतो,...

लग्नवाढदिवस

Image
  माझं मन तुझं मन ,  कधीतरी एक झालं आशीर्वादांनी अनेकांच्या  सहजीवन सुरु झालं प्रेमाच्या बहरण्याबरोबर  जबाबदारीचं भान आलं पती पत्नीचं संसारचक्र सुरू झालं  मनांनी दोघे एकत्र नांदून , दोन्ही कुटुंबांना  धाग्यात बांधलं. जोडायची रीत सांभाळून अनेक परिवारांनाही बरोबर जोडलं . तारेवरची कसरत असते सगळ्यांना बरोबर नेण्याची कधी रुसवा कधी गोडवा यातंच तर मजा संसाराची. माझ्या बेफिकीरीला तुझ्या जाणीवांचा लगाम असतो वाहणाऱ्या  अश्रूंना तुझ्या माझ्या खांद्याचा आधार असतो कधी भांडण कधी समजावणी कधी अबोला कधी मनधरणी एक चिडला तर दुसरा शांत  कपातलं वादळही बशीत शांत दोन जीवांतून एक जीव हळूच अंकुरला जगण्याला एक वेगळाच अर्थ मिळाला लग्नाचा अजब खेळ रंगला मनामनाचा अप्रतिम मेळ जमला आज २७ वर्षे आणि पुढे राहुल लाळे... ०९.११. Happy Anniversary  💐💐

अमृतधारा

Image
 अमृतधारा रा.  बरसत रहाव्या या जलधारा भासती या जणू अमृतधारा  पाण्याविना कसे सारे शुष्क चार सरीही देती अपार सुख मेघ दाटता मोर नाचती कडाडत्या विजा चमचम करती पाऊस येता मंडूक डर्रावती चातकही ते सुखावून जाती हिरव्या शालूने नटू दे धरती चिंब भिजू दे हिरवी पाती मनांत दाटावी ओली प्रिती अमृतधारांची किती ही महती ©राहुल लाळे🌈 ११-०६-२०२२

वटपौर्णिमा

Image
 *वटपौर्णिमा* राहुल तो वड एक महान घालून प्रदक्षिणा ज्याला परत  मिळवले सावित्रीने आपल्या प्रिय पतीचे प्राण तो आणि असे अनेक वड अजूनही उभे आहेत पाय जमिनीत रोवून घट्ट ऐकतात दरवर्षी ते नवसावित्रींचें  पतीहट्ट वडाला फेऱ्या मारणाऱ्या दोरीचे बंध बांधणाऱ्या  सगळ्या  स्त्रिया का  सावित्री असतात ? ज्यांच्यासाठी  त्या व्रत करतात सगळे का  ते सत्यवान असतात ? सात जन्मी हाच मिळावा जोडीदार यासाठीच  होते जरी प्रार्थना मनात दोघांच्या असतात का नक्की तशाच भावना ? सावित्रीला आजच्या हवा आहे खरंच तो सत्यवान जन्मोजन्मी ? आणि ज्याच्यासाठी उपास करतात सत्यवानाला त्या  हवीय का तीच सावित्री पुढल्या तरी जन्मी !!! सावित्री -सत्यवान महती त्यांची थोर त्यांच्यापुढे आपण सारे लहानथोर महत्वाची आहे तरी प्रेम -भावना सात जन्म कोणी पाहिलेत ? हाच जन्म महत्वाचा मिळाली ती सावित्री आहे तो सत्यवान जपायचा संस्कार म्हणून तरी वटपौर्णिमा सण साजरा करत राहूया   ... नवरा बायकोने विश्वास अन् प्रेमाचं  रोप सतत फुलवत ठेऊया ©राहुल लाळे  🌈

वटपोर्णिमा पुरुषांची

Image
 वटपौर्णिमा....रा. सगळे व्रतवैकल्य पूजाअर्चा फक्त बायकोनेच नवऱ्यासाठी करायच्या.. मग नवरा बायकोसाठी चार शब्द तर निश्चितच लिहू शकतो... श्रमतेस दिवसभर तू थकतेस माझ्या पायी प्रेमिका होतेस कधी कधी होतेस आई असतेस माझ्या मागे खंबीरपणे सदा तू सांभाळतेस कुटुंब सारे विसरून देहभान तू जोडी तुझी माझी, विधात्याने सांधली फुलबाग संसाराची, आपुल्या प्रेमातून सजली कृतज्ञ आहे मी, नित्य त्याच्या पायी विश्वास प्रेम माझे , सदा तुझ्या ठायी ©राहुल लाळे 🌈

मै वारी वारी जाऊँ

Image
 मै वारी वारी जाऊँ राहुल मैं वारी वारी जाऊँ ग्यानबा-तुकाराम भजूँ मनसे विठूको पुजूँ तनमनधन बिसरूँ जमाना बिसर मैं झुमूँ बारीश की बूंदोंमें नाचूँ और थक गया तो भजियाँ खाऊँ चाय का स्वाद लेकर ताजा होऊँ फिर लगनसे काम को लग जाऊँ ग्यानबा तुकाराम  विठोब्बा रख्माईको मनमें रख्खूँ मै वारी वारी जाऊँ राहुल

आकाशचांदणे

Image
  तुझ्या मनातल्या शब्दांचे माझ्या ओठांवर गाणे जरी भरलेले आकाश मनी माझ्या चांदणे राहुल

काश्मीर... कलम ३७०

Image
 कालपासून काश्मीर आणि कलम ३७० च्या पुनर्गठनाबद्दल संसदेत पास झालेल्या बिलबद्दल अनेक पोस्ट्स आल्या ....काही बाजूने काही विरोधात... माझे दोन शब्द... राहुल कलम३७० ,३५अ अशी कलमं देशासाठी भूषणावह निश्चितच नाहीत उलट  एखादा  देश एकसंघ रहाण्यासाठी ती बाधाच आणतात.  काश्मीर मध्ये गेलो तर शंकराचार्य मंदिर सोडलं तर श्रीनगर, सोनमर्ग, गुलमर्ग, पहलगाम, अनंतनाग काश्मीरखोऱ्यात सर्वत्र हिंडताना आपण स्वर्गीय निसर्गसौंदर्याने भारावून मोहावून गेलो तरी तेथलं वातावरण अगदी लोकांचे पेहराव, हावभाव, दुकानांवरील पाट्या पाहून आपण आपल्याच देशात आहोत का पाकिस्तानात असा प्रश्न पडतो. अगदी जम्मू ची जनता( आमचा ड्रायव्हर जम्मू चा होता) ही आपण J&Kचे नाही तर जम्मूचे आहोत असं म्हणतो. पटनी टॉप, कटरा, उधमपूर, जम्मू या भागात मात्र आपल्याला आपण आपल्या भागात आहोत असं वाटून हायसं वाटतं. सध्याच्या अशांत , दहशतीच्या अस्थिर वातावरणास काश्मिरी जनतेच्या चा तरी काय दोष ? जुनी पिढी जी स्वातंत्र्यासुमारास होती त्यांची नाळ  हिंदुस्थान-भारताशी जोडलेली होती. पण ३७०,३५अ यांमुळे हा प्रदेश, नवीन पिढीतील जनता मुख्य प...

शिक्षक दिन

Image
 *सर्वच माझे शिक्षक* राहुल शिकवणारे अनेक मिळाले अनेक जण असेच  काहींना मी निवडले काहींनी मला निवडले काहींकडे नकळत शिकलो बघता बघता बरंच समजलो काहींना कळले मी शिकतोय नुसताच पाहून... काहींना बरेच प्रयत्न पडले काय करायचे, काय नाही काय धरायचे, काय सोडायचे कसं वागायचं,  कसं बोलायचं कसं पहायचं, कसं चालायचं  कसं समजून घ्यायचं, कसं समजवयाचं माणूस म्हणून कसं जगायचं काहींना समाधान त्यांच्या कमाईत काहींना माझ्या प्रगतीत बरंच शिकत गेलो ...    शिकवतही गेलो शिकवणारे मिळतच गेले... आणि काही शिकणारेही ज्या सर्वांकडून शिकलो.. शिकत राहीन... अशा सर्वच शिक्षकांना सादर प्रणाम *शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा* © राहुल लाळे ०५-०९-२०१९

इस्रो..संपर्क

Image
 *संपर्क तुटेल, संकल्प नाही...* संपर्क तुटला, संकल्प नाही खचून जाणारे आम्ही नक्कीच नाही *विक्रमाने* हुलकावणी दिली तरी *प्रज्ञाना* ची साथ सोडणार नाही चंद्राचे आहे जुनेच आकर्षण.. श्रीरामाला ही त्याने घातली भुरळ प्रेमाचे आमच्या तो प्रतीक आहे शास्त्रज्ञांसाठी कुतूहल आहे हनुमंताचे भक्त आम्ही  चंद्रच काय सुर्यालाही गवसणी घालू वेडे प्रेमवीर आम्ही पुन्हा पुन्हा फिरुन येऊ तो तिथेच कायम असेल  निर्धार आमचा दशपट होईल संपर्क तुटेल, संकल्प नाही खचून जाणारे आम्ही निश्चितच नाही राहुल लाळे ०७-०९-२०१९

आसमंती रक्तिमा

Image
 काल संध्याकाळी घरी परतताना सारसबागेपाशी दिसलेलं सुंदर दृश्य आणि सुचलेल्या चार ओळी.... आसमंती  पहा रक्तिमा ती विरु लागली निळी सावळी शाल आकाशाने पांघरली गर्द हिरवी झाडे वाऱ्यावर डोलती चाकरमान्यांसोबत पक्षीही घरटी परतती शामवर्णी मेघांना शोभवते रंगांची उधळण  विहंगम दृष्य पाहून मोहावते अधीर मन राहुल ,.

ट्रेक च्या गंमती

Image
 ट्रेक च्या गंमती आतापर्यंत अनेक ट्रेक केले... प्रत्येक ट्रेकचे वेगळे अनुभव... अनेक गमतीजमती, काही थरार.. एसपी मध्ये असताना अकरावीत पहिला ट्रेक केला होता..कात्रज ते सिंहगड... आता याला K2S म्हणतात...मला आठवतंय मी, वाळ्या(डॉ प्रसाद वाळिंबे) प्रमोद(कनकुरे), बल्ल्या(संदीप शहा), सुमित फडणीस , बहुतेक प्रसाद (जो)आणि एक दोनजण (sorry)....आमचा लीडर शेव्या-शेवगावकर.  त्यावेळी कोणाकडेच कॅमेरे नव्हते पण आठवणी ताज्या आहेत. सकाळी लवकर स्वारगेटला जाऊन एसटीने कात्रज घाटात  उतरलो होतो... मजल दरमजल करत १८-२० डोंगर पार करत, एक दोन वेळा वाट चुकल्यावर  डोंगरात देवासारख्या भेटलेल्या धनगराकडून मार्ग समजून घेऊन दमून भागून चारपाच तासांनी जेव्हां कोंढणपूरहून सिंहगडला जाणाऱ्या टाररोडला लागलो तेव्हा हुश्श झाले.  मध्ये जवळचे पाणी संपले, दोघांचे बूट फाटले, शेव्याचा उत्साह कायम होता.. आणि सर्वांना बोलतं ठेवून, खेचाखेची करून मूड मेनटेन करत होता. पुढचा रस्ता काटून गडावर पोचेपर्यंत २-२:३० वाजले. गडाला चक्कर मारुन मस्त पिठलं-भाकरी, भजी, दही -ताकावर ताव मारुन , देवटाकीचे थंडगार पाणी पिऊन आत्मे शांत...

जिंदगी हमेशा

Image
 *जिंदगी हमेशा* राहुल *जीनेकी कश्मकश में जिंदगी की रफ्तार काफी तेज हुई होगी* *शायद उसे  धीमा करने ही, अब ये घडी आयी होगी* *कुछ वक्त मिल रहा है, खुद को सम्हलने के लिये* *फुरसत मिली है थोडी, खुद को समझने के लिये* *वक्त थोडा कठीन है, रास्ता डरावना लग रहा है* *मगर उम्मीदे अभी भी मुकम्मल है* *हो सकता है, अपने कुछ बिखर सकते है* *लेकीन अपनोंको साथ देनेका इरादा मजबूत है* *आशा मन में  है ...ये तूफान भी थमेगा एक दिन* *कश्ती किनारे को लगायेंगे जरुर हम एक दिन* *मौत एक ही बार आती है दोस्तों..डर किस लिये* *जिंदगी है रोज हमेशा  ...खूब जीने के लिये* *खूब जियो* *भरपूर जियो* ©राहुल लाळे १७-०६-२०२०

ऑप्शन...पर्याय

 https://youtu.be/odh8naCj85M सकाळी कुठंतरी वाचलं आणि *ऑप्शन*  ही शॉर्टफिल्म पाहिली...  फक्त ९-१० मिनिटांची फिल्म..पण सुनील बर्वे आणि मृणाल कुलकर्णी यांनी किती किती छान व्यक्तता प्रदर्शित केलीय... सुचलेल्या चार ओळी... *ऑप्शन - पर्याय* राहुल प्रत्येक जण एक पर्याय शोधतो अगदी लहानपणासून प्रत्येक गोष्टीत हा नाही तर तो पर्याय आहेच शोधतो कोणी  कोणते विषय घ्यायचे त्याचा  पर्याय कोणी परीक्षेत दिलेल्या प्रश्नांपैकी कोणता सोडवायचा  तो पर्याय शिक्षण झाल्यावर मिळालेल्या अनेक संधीत  आपण स्वीकारतो तो एक पर्याय कमावते झाल्यावर काय करायचं, कुठं जायचं त्याचे पर्याय एकटं राहायचं का दुकटं व्हायचं हाही पर्यायच मग अनेकांपैकी एक निवडणं ... आपल्याला आवडणारं का पालकांना .. हा एक मोठा पर्याय तो निवडला की मग नातं निर्माण होतं  आपण एकमेकांचे पर्याय होतो किंवा दाखवतो तरी तसं …. पण नात्यात गरजेला पर्याय कोणता ? गरज एकट्याला असून चालत नाही ती दोघांनाही हवीच कारण भाळणं संपलं  की पर्याय फक्त सांभाळणं आणि ते जमलं की ..मग जीवन जगण्याचे अनेक पर्याय कधी जवळ राहून, तर कधी दूर रा...