Posts

Showing posts from April, 2023

उत्तरवाहिनी नर्मदा

Image
 *उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमा* राहुल लाळे गंगैच यमुनेचैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जले अस्मिन् सन्निधिम् कुरु आपल्या हिंदू संस्कृतीत जल म्हणजे पाण्याला अत्यंत महत्वाचं असं पवित्र स्थान आहे. हेच महत्व आपल्या जीवनात स्वार्थ आणि परमार्थ यांचा मेळ घडवतं. सुरवातीला उल्लेखलेला स्नानमंत्र निसर्ग व मानवजात यांच्यातील गहिऱ्या संबंधांची साक्ष देतंच तसंच प्रत्येक नदीची महतीही अधोरेखित करतो. गंगा ज्ञानाचं, यमुना भक्तिचं, गोदावरी ऐश्वर्याचं, सरस्वती विवेकाचं , कृष्णा कामनेचं तर ब्रम्हपुत्रा तेजाचं प्रतीक मानलं जातं. या सर्व नद्यांची निर्मळता, ओजस्वी व मंगल भाव यांमुळे या नद्या आपल्या श्रद्धास्थानी व पूजनीय आहेत. नर्मदेची वैशिष्ट्य हे की बाकी सगळ्या नद्या पूर्वेकडे वहात जाते असताना नर्मदा (व तापी..तप्ती) पश्चिम वाहिनी आहेत. नर्मदेचा जन्म तांडव करताना भगवान शंकराच्या घामातून झाला आणि म्हणूनच नर्मदेला शंकराची मुलगी मानलं जातं. "नर्मदा माँ  जेटला कंकर  एटला बडा शिवशंकर " - अर्थात नर्मदेतले सगळे गोटे हे शिवशंभूचे प्रतीक आहेत.  नर्मदेचं एक महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे तिच्या विस...