Posts

Showing posts from May, 2019
Image
स्वप्न फुलांनो.... स्वप्न फुलांनो माझ्यासंगे सतत तुम्ही बहरत रहा जीवन तुमचे जरी क्षणभर उभारी देता  तुम्ही जीवनभर सोनेरी क्षितिजे सजवीत रहा उमेद मनाला तुम्ही देत रहा बेभान मी,  स्वच्छंदी तुम्ही शब्दविहार करु जन्मोजन्मी स्वप्न फुलांनो माझ्या संगे सतत तुम्ही बहरत रहा माझ्या सवे तुम्ही ही माझ्या आप्तजनांना रिझवत रहा राहुल लाळे १६-५-२०१९
Image
आई आपली पहिली गुरु... निस्वार्थ प्रेमाची...त्यागाची.. आई कोण असते ? आई"..."आई"...असते... देऊळ नसते...देवळातील देव नसते... देवाला अर्पिलेले फुल नसते... चंद्र, चांदणे  तारा, वारा,  आभाळ नसते... अथांग पसरलेला सागर नसते... "आई"...म्हणजे नक्की कोण ...? कोण सांगू शकेल?.. पण तरीही मला वाटते... "आई"... म्हणजे तीच्या मुलाला... या जगात तुच "सर्वश्रेष्ठ" आहेस... असा आत्मविश्वास देणारी... एक महान...प्रेमळ...व्यक्ती...असते कितीही मोठा झालो तरी बाळा अशी हाक माणारी "आई"...ही "आईच"...असते...!!!! राहुल लाळे
Image
** *आई* **   आई - उच्चारलेले पहिले नाव आनंद वेदना प्रत्येक प्रसंगात ओठी येणारे तेच नाव जवळ असते तेंव्हा  नसते भान आणि नसते तेंव्हा अडते प्रत्येक पान मोठे झालो दूर गेलो पण आई पाशी  कायम लहानच राहिलो सण-वार आले की तिच्या हाताची चव आठवते आणि मनात उमाळे दाटून  येतात मनाच्या प्रत्येक कोपऱ्यात तिच्या अनेक आठवणी आहेत तिच्या मुलालाच फक्त कळावेत असे काही शब्द आहेत आई  असते घरातील एक धागा घरातील सगळ्या फुलाचा हार करून  त्यांना दाखवते योग्य जागा पाऊस येतो  ओले करून जातो आईच्या प्रेमाच्या पावसासाठी आपण कायमच  आसुसलेले राहतो वर वर तिचे अस्तित्व जाणवत नाही ठेच लागली तर तिच्याशिवाय कोणाला साद जात नाही आई सर्वांची काही वेगळी नसावी माझ्या सारखीच तुमची असावी खरच आई बाळाची माउली असते भर उन्हात शांत  सावली असते दुधातली मलई असते भांड्यांना तेजावणारी कल्हई असते आई जशी कृष्णाने द्रौपदीला दिलेली थाळी कधीही न संपणारी तिची प्रेमाची झोळी राहुल  लाळे

साच पास, हिमाचल, एक थरारक स्वर्गीय प्रवास

Image
साच पास... एक थरारक स्वर्गीय प्रवास © राहुल लाळे खज्जिआर , ग्रीन व्हॅली, दायन कुंड (डैंडकुंड), कालाटोप, चंबा  आणि इतर ठिकाणांना जाताना दूरवर दिसणारे बर्फाच्छादित उंच  पर्वत फारच आकर्षक पण थोडे भयावहही दिसत होते. ड्रायव्हरला विचारलं ते कोणते पर्वत आहेत..."साच पास" म्हणून उत्तर मिळाले. नेट वरून माहिती काढली. डलहौसी पासून  साधारण १५० किमी अंतरावर चंबा जिल्ह्यातलं १४५०० फुटांवर असलेलं ठिकाण.  हा पास चंबा आणि पांगी या दोन व्हॅलीज् ना जोडतो. पठाणकोटहून  लेहला मनाली वरुन जायला ८०० किमी.लागतात तर साच पासमधून हे अंतर १५०-१६० किमीने कमी होतं...म्हणून हा रस्ता आर्मीने बांधलाय. इथून किल्लार, किलॉंग, लेह, रोहतांग पासकडून मनाली, स्पिती व्हॅलीकडे ही जाता येतं. पण रस्ता एकदम अरुंद आणि अवघड आहे. जगातील सर्वात टफ रस्त्यातील तीन नंबरचा म्हणून ही कळालं. एवढं समजल्यावर आधी ठरलेला प्लॅन बदलून साच पासला  जावं का हा कीडा डोक्यात आला. ड्रायव्हर कडून बैरागढ या साचपासच्या अलीकडे असलेल्या त्याच्या ओळखीत फोन करून चौकशी केली की पास उघडला का नाही. कारण गुगलवर तो जून जुलै मध्...