The Vaccine War
द वॅक्सीन वॉर ... जिंकलेल्या युद्धाचा दुर्लक्षित लढा राहुल प्रत्येक माणसाचं एक स्वप्न असतं की आपली - आपल्या देशाची एक कहाणी असावी . भारताचं चंद्रयान-३ चंद्रावर उतरलं, तेही जिथं आत्तापर्यंत कोणताही प्रगत देशाने पाऊल न ठेवलेल्या चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर ... आणि जगभरातल्या सर्व भारतीयांची मान उंच झाली आपलीही एक कहाणी झाली - आदित्य मिशननेही दुसऱ्या कहाणीची सुरुवात केली. आणि रविवारीच भारताने गगनयानाची यशस्वी चाचणी करून आणखी एका येऊ घातलेल्या कहाणीची घोषणा केली. दोन -तीन वर्षांपूर्वी भारताने अशीच एक मोठी यशस्वी कहाणी घडवली होती. करोनापासून वाचवणाऱ्या कोवॅक्सीन या आपल्या देशात संपूर्णपणे विकसित झालेल्या भारतीय बनावटीच्या लशीची . कारण भारताने फक्त आपल्या देशातंच नाही तर जगातल्या १०१ देशातही वितरित करून मानवतेचं मोठं उदाहरण जगापुढे घालून दिलं होतं . तेव्हा करोनाच्या महाभयंकर संकटात त्या कहाणीला -संपूर्ण जगात आपल्या देशाला नाव मिळालं. पण ती कहाणी ज्यांच्यामुळे शक्य झाली - ज्यांनी आपलं सर्वस्व प...