12th Fail...हारा वही जो लडा नहीं
#CinemaGully *12th Fail ... हारा वही जो लडा नहीं* राहुल लाळे मागच्या महिन्यात माझा कट्टा वर IPS मनोज शर्मा आणि त्यांची पत्नी IRS श्रद्धा यांची मुलाखत पाहिली - त्यांची मुलाखतीतून चंबळ खोऱ्यातल्या बिलग्राम या छोट्याशा खेड्यात जन्मलेल्या बारावी नापास तरुणाचा नानाविध संकटातून तावून सुलाखून निघत अशक्यप्राय वाटणाऱ्या UPSC ची परीक्षा शेवटच्या प्रयत्नात पास करण्याचा आणि पुढेही एक IPS अधिकारी म्हणून सचोटीने सुरु असणारा प्रवास आणि त्यातल्या विलक्षण गोष्टी कळाल्या. त्यांच्या पत्नीने त्यांना UPSC च्या आणि नंतरच्या प्रवासात दिलेली साथ ( त्यांनी गेल्या सतरा अठरा वर्षात सराफाच्या दुकानाची पायरी चढलेली नाही - हे सिनेमात नाही ) हे ऐकून 12th Fail हा विधू विनोद चोप्राचा सिनेमा पहायचं ठरवलं आणि पाहिलाच - परवा OTT वर परत पाहिला. कोणत्याही परीक्षेत नापास झालेल्या माणसाकडे पुण्या -मुंबईत कोणत्या नजरेने पाहतात - हे आपण जाणतो. गंमतीची गोष्ट अशी की दहावी-बारावी होऊन ३५ हून अधिक वर्ष उलटून गेल्यावर आणि आता आपल्या आयुष्यात मस्तपणे स्थिरस्थावर झालेल्या काही मित्रांकडे हे ते...