आसमंती पहा रक्तिमा ती विरु लागली निळी सावळी शाल आकाशाने पांघरली गर्द हिरवी झाडे वाऱ्यावर डोलती चाकरमान्यांसोबत पक्षीही घरटी परतती शामवर्णी मेघांना शोभवते रंगांची उधळण विहंगम दृष्य पाहून मोहावते अधीर मन राहुल ,१८.०९.२०१९.