Posts

Showing posts from February, 2021

तुक्याची आवली

Image
 तुक्याची आवली... मंजुश्री गोखले यांचं फार अप्रतिम पुस्तक... त्यावरून सुचलेलं... राहुल आवली गाती सारे देवा, तुक्याचे तुझ्या गोड अभंग आवलीच्या भाबड्या जीवाला मिळेना त्याचा संग भक्ती तुक्याची अपरंपार , शब्दातूनही वाहे अमृत अश्राप आवलीला मात्र घरादाराची लागे खंत चूल पेटेल का हो कधी वाचून नुसती गीता एकल्या आवलीला पोराबाळांची सदा चिंता विठूनामात रमला रंगला आवलीचा धनी संसारगाडा ओढताना डोळ्यात येई तिच्या पाणी कटीवर हात विठूचे, पर्वा त्याला साऱ्या जगाची चंद्रभागेतून वाचले अभंग, भिजली आवलीची ओझी तुक्या विठूचा भक्त,  त्याची एक आवली जिथे जातो तिथे, , तीच त्याची सावली राहुल लाळे ०२-०२-२०२१