इक दीवाना था...चिंटू
*इक दिवाना था… चिंटू* राहुल लाळे श्री ग णे शा य न म हा .. हमने तुमको देखा तुमने हमको देखा कैसे हम तुम सनम सातो जनम मिलते रहे है हो जैसे जेंव्हापासून गाण्याच्या भेंड्या खेळतोय तेंव्हा सुरवातीचं गाणं कोणी म्हणायचं आणि अक्षर कुठलं हे ठरवण्यासाठी आणि खेळाचा श्रीगणेशा करायला ... अक्षर तर 'ह' च आणि माझ्यावर आलं की हमखास मी " हमने तुमको देखा " याच गाण्याने अजूनही सुरवात करतो… तसं 'ह' नी " हम-तुम एक कमरे में बंद हो " हेही म्हणलं जायचं - आणि फाऊल मिळायचा - तेंव्हा गाण्याचा अर्थही कळायचा नाही - कुठला सिनेमा - कोणावर चित्रित झालंय - गायक -संगीतकार -गीतकार कोण ? हे काही माहित नव्हतं - म्हणायला छान वाटायचं. माझा काका तर " ये तो हो ना ही था " मस्त झोकात म्हणायचा. असंच काहीसं खुल्लम खुलला प्यार करेंगे हम दोनो - एक मै और एक तू - मै शायर तो नहीं या गाण्यांबाबतीत. घराजवळच वसंत टॉकीज होतं - तिथली सरगमची ऋषीकपूरची डफली वाजवतानाची व जयाप्रदाची नृत्यअदाकारीची पोस्टर्स पाहून अरे आपण जी गाणी ऐकत होतो ती सि...