पगलैट
#CinemaGully #spoileralert #पगलैट *पगलैट* सिनेमाचं नावआणि काही इंटरेस्टिंग प्रतिक्रिया वाचून "पगलैट " एकदाचा पाहिलाच . "पगलैट" या शब्दाचा - टायटलचा पागल - वेडसर - भंपक - क्रेझी असा काहीसा अर्थ आणि सान्या मल्होत्रा लीड रोलमध्ये हेही एक कारण होतंच. सिनेमा सुरु होतानाच घरात कोणाचा तरी मृत्यू झालाय हे सर्वांच्या चेहऱ्यावरून कळतं . आणि अशा सुरवातीतून आणि गेलेला माणूस हा नायिकेचा म्हणजे संध्या गिरी(सान्या) चा नवराच - आस्तिक गिरी आहे हे कळल्यावर आता पूर्ण सिनेमा मेलोड्रामा आहे का असं वाटणं साहजिकच होतं . जरी आपल्या सिनेमात मृत्यू - नंतरचे अंत्यविधी आणि इतर सोपस्कार अनेक वेळा दिसत असले तरी इथे दिग्दर्शकाने अशा वेळी घरातल्या लहान थोर माणसांच्या मनस्थितीचे अगदी पहिल्या दिवसापासून तेराव्या दिवसांपर्यंत कसे बदल होत जातात , हे फार जवळून आणि फार मेलोड्रॅमॅटिक न करता सॅटायर विनोदी ढंगाने दाखवले आहे - ५ महिन्यांपूर्वीच लग्न झालेलया मुलाच्या मृत्यूच्या आघाताने खचलेले आई-वडील आणि घरातील वयस्कर , नवविवाहित पण आता विधवा झालेल्या सुनेशी...