संजू
*संजू …. कुछ तो लोग कहेंगे* राहुल गेले काही दिवस सोशल / प्रिंट मीडियावर बरंच उलट सुलट चर्चिला गेलेला "संजू" शेवटी पाहिलाच. तसं पाहिलं तर मी रणबीर कपूरचा फॅन - अगदी रॉकस्टार - अजब प्रेम कि गजब कहानी, ये जवानी है दिवानी , राजनीती, बॉंबे वेल्व्हेट, ऐ दिल है मुश्किल सगळेच सिनेमे पहिले होते - काही आपटले असतीलही पण त्याचा पडद्यावरील वावर- त्याचे बोलणारे डोळे मला कायमच भावले. राजकुमार हिरानीचेही बहुतेक सर्वच सिनेमे म्हणजे मिशन काश्मीर ( एडिटिंग), मुन्नाभाई १-२, ३ इडियट्स ,पीके मी पाहिले होते आणि आवडले होते. त्यामुळे संजय दत्तसाठी नाही तरी या दोघांसाठी संजू पाहायचा असं मनात होतं. लहानपणापासून मुन्नाभाई वगळता संजय दत्तचा एकही चित्रपट थिएटरमध्ये जाऊन पहिला नव्हता- अगदी शाळेत असताना रॉकीचे / विधाताचे मोठे मोठे होर्डिंग घराजवळील वसंत टॉकीजवर लावलेले बघूनही....कारण या महाराजांचे प्रताप ऐकून तिडीक मनात भरलेली. पण मुन्नाभाई खरंच आवडले होते - हिरानींच्या कौशल्यामुळे - अर्शद वारसी आणि बोमन इराणीमुळे आणि कथेच्या वेगळेपणामुळे बहुधा - जास्त. प्रोमोजमधील रणबीर...