Posts

Showing posts from April, 2025

रामजन्मभूमी

Image
 श्रीराम जन्मभूमि... स्वप्नपूर्तीचं एक वर्ष  राहुल  शब्दाशब्दात आहे राम , वचनांचे सारे सार राम I भावभक्तीत आहे राम , भावविश्वच सारे आहे राम II साऱ्या विश्वाचे निर्माते राम , सकलांचे पालनकर्ता राम I युगायुगांचे तारक राम , मर्यादा पुरुषोत्तम राजाराम II सद्गुणसंपन्न अवतारी राम , विशालहृदयी जय श्रीराम I मनोमनी आज एकच नाम , रघुपति राघव राजाराम II रघुपति राघव राजाराम II ©राहुल लाळे

रामनवमी

Image
 तरुणौ रूपसंपन्नौ सुकुमारौ महाबलौ ‌। पुंडरीक विशालाक्षौ चीर कृष्णा जिनाम्बरौ ।। आज रामनवमी आहे.   प्रभूंच्या गोंदवल्यातल्या या मूर्ती पहाताना मन भारावून जातं कलाकाराने आपली सगळी कल्पना शक्ती वापरून रामचंद्रांचे अति अति लोभस मूर्ती  बनवली आहे.  हा जानकीवल्लभ जणू त्याला दर्शन देता झाला, आणि एक कलाकृती घडून गेली.  कलाकृती म्हणावे की अस्सल छायाचित्र म्हणावे ?   राम रक्षेत वर्णन केल्या प्रमाणे तो राजीव लोचन आहे. मुखावर विलक्षण आल्हाददायक , आश्वासक हास्य आहे.शांतमूर्ती लोकभीराम आहे. सुकुमार आहे. महाबली आहे. नानालंकारदीप्तम आहे.  ध्यायेदाजानूबाहु आहे. धृतशरधनूषं आहे. पाठीला भाता आहे.  शरीर बळकट आहे. डोळ्यात खट्याळपणा आहे. गळ्यात हार आहे. मनातली असणारी सारी रघुभक्ती उचंबळवुन टाकणारी.पहातच राहावा असा राजाराम.   🙏🏼 रामनवमी च्या हार्दिक शुभेच्छा 🙏🏼