ग्रेस ...वाढदिवस
*ग्रेस*.. आज जन्मदिन राहुल लाळे Take my wine in my own cup, friend, It loses its wreath of foam when poured into that of others'. असं कुठतरी वाचलंय मर्ढेकरांची एक ओळ आठवली. 'जर तुम्हांला कविता कळली नसेल तर ती तुमच्यासाठी नाहीये'. त्यामुळे जर का कुणाला ग्रेसची कविता कळत नसेल तर ती त्याच्यासाठी नाहीये, असं समजावं आणि त्या कवितेला किंवा स्वतःच्या बुद्धीला दोष न देता फक्त त्या कवितेतल्या शब्दांचा आनंद घ्यावा आणि पुढे जावं. भय इथले संपत नाही...ग्रेस इथं आयुष्याच्या संध्याकाळच्या आपल्या मनःस्थितीचं वर्णन करतोय. एकीकडे विरक्ती त्याला खुणावत आहे, पण विरक्तीची कल्पना त्याच्या मनात एक अनामिक भीती उत्पन्न करते आहे आणि मग त्याला त्याच्या आईच्या आठवणी व्याकूळ करून सोडताहेत. ग्रेसची कविता अनेकांना दुर्बोध , अनाकलनीय वाटते... भय इथले पण .... अशीच...वरवरती प्रियकराने प्रियेच्या विरहात आठवणीत गायलेलं काव्य वाटावं....पण प्रत्यक्षात एका आईवेड्या मुलाने आईच्या आठवणीत लिहिलेल्या आर्त पंक्ती.... ग्रेसचे तुला पाहिले मी नदीच्या किनारी ही सुध्दा अशीच एक रचना... विचार करायला लावणारी..जेव्हां मी कु...