द कश्मीर फाईल्स
*द कश्मीर फाईल्स .. एक जळजळीत अंजन* राहुल लाळे आपली एखादी वस्तू हरवली तर आपण शोधायचा प्रयत्न करतो - मिळाली तर सांभाळून ठेवतो - नाहीच मिळाली तर हळहळतो, ती वस्तू आवडती असो व नावडती आपल्याकडून कुणी घेतली बळकावली तर?.. ती आपण मिळवण्याचा प्रयत्न करतो पण घेणारा ताकतवान आणि गुंड प्रवृत्तीचा असला तर .. सोडून देतो - नवीन घेतो – पण एखाद्याने आपलं घरच बळकावले तर ? नेसत्या वस्त्रांनिशी आपल्याला घराबाहेर काढलं तर? आपल्याच डोळ्यांसमोर आपल्या आयाबहिणीमुलींवर अत्याचार करून, घरातल्या लहानमोठ्या व्यक्तींची हत्या करून आपल्याला कोणी देशोधाडीला लावलं तर? , तेही आपल्या स्वतःच्याच देशात ? तर काय अवस्था होईल आपली ? कुठे जाऊ आपण ? … कल्पना करवते ?... नाही ना ? *वसुधैव कुटुंबकम* " अशी धारणा बाळगून सर्व जगाला आपलं घर मानणाऱ्या व सर्व जगाला आपले दरवाजे सदैव उघडे ठेवणाऱ्या , आपल्याच देशात आपल्याच भाऊबंदांना फार पूर्वी नाही - फक्त ३०-३२ वर्षांपूर्वी , पृथ्वीवरील स्वर्ग, देशाचा मुकुटमणी असलेल्या काश्मीरमधून कसं निर्दयतेने अमानुषपणे नि...