Posts

Showing posts from October, 2020

कोजागिरी

Image
  कोजागिरी... चंद्र मनी आज माझ्या अन्  तिच्या हृदयातही... नयनी नेत्र गुंतले, अन् चांदणे गात्रांतूनी प्रीत फुलली ही साजिरी तिची नजर पीत माझी 'कोजागिरी'...II © राहुल

निसर्गाचा दसरा

Image
  निसर्गाचा दसरा निसर्ग  किमयागार अफलातून  नयनरम्य दृष्यांनी ठेवतो खिळवून कधीतरी देतो अद्वैताचे भान मूकजीवांना कधी चरण्यास रान हिरव्यागार कुरणांनी धरतीला सजवी परोपकाराची भाषा तो शिकवी मातीचा गंध ..लावी ध्यास सृजनाचा आधारही मोठा तोच मानवाचा  याच्या असीमतेला सीमा नाही विजयादशमीचे सोने भरभरुन वाही फुलवतो बघा कसा हा कट्टा सराफाचा सजवून कंठ आपला मिरवतो दसऱ्याचा राहुल लाळे                     Photo courtesy Mr Sunil Limaye

*पानगळ*

Image
 * पानगळ * राहुल पानगळ जरी झाली तरीही झाड परत बहरते... फुलंफळं लुटली जाऊनही खोडाला पुन्हा पालवी फुटते... आपणही का नाही मग झाड व्हावं ? आप्तजनांची पानं गळता हुंदके गिळून नवा बहर ल्यावा.... आशेची पालवी नेसावी आठवणीतून नवस्वप्ने पहावी छायेत आपल्या इतरांनाही सावली द्यावी सारी दुनिया खुलवून टाकावी.... © राहुल लाळे

सागर किनारा

Image
 उंच ताड माड, डौलदार झाडे पोफळी,सुपारी ...डोलतात वेडे निळ्याशार लाटा, अथांग क्षितिज दूरवर तिथे ... एक विहारे जहाज मंद मंद वारा,  निसर्ग साजिरा खुणावतो मज , हा सागर किनारा फेसाळत्या लाटा, मन होई दंग हळूच पाय टाकता...उठती तरंग ऊंच आकाशात... विहग उडतो मजेत निळाई अथांग...वाटे घ्यावी कवेत सृष्टी निसर्गरम्य, डोळ्यात मावेना परतीची वाट, धरावी वाटेना.... ©राहुल लाळे

सहल....भटकंती, पर्यटन का निवांत विश्रांती*

Image
* सहल....भटकंती, पर्यटन का निवांत विश्रांती* राहुल लाळे दररोजच्या रुटीन धकाधकीच्या आयुष्यातून विसांवा , विरंगुळा मिळवण्यासाठी प्रत्येक जण काही तरी मार्ग शोधत असतो .. सिनेमे पाहणे,गाणी म्हणणे -ऐकणे , वाचन , नातेवाईकांकडे जाणे - काहींना काही न करता निवांत  घरात बसून टीव्ही पाहत रमत गमत  दिवस घालवायलाही आवडतं . तर हल्ली अनेक जण देश परदेशांत वेगवेगळ्या ठिकाणी सहलीला जातात. या सहलींची एक मजा आहे.. अनेक जण चौधरी यात्रा कंपनी (माझा आक्षेप नाही, निरिक्षण फक्त), एकाच ट्रीपमधे पंधरावीस एकमेकांपासून लांबलांब अंतरांवरची ठिकाणी सहलीला जातात... तर काही एकाच ठिकाणी जाऊन छान रिलॅक्स होतात...काहींना एकटं किंवा कस्टमाईज्ड प्रायव्हेट टूर्स आवडतात तर... काहींना फार तकतक , दगदग  नको म्हणून सर्वसोयीयुक्त केसरी, वीणा वर्ल्ड सारख्या नामांकित ट्रॅव्हल कंपनीकडून व्यवस्थित अरेंज केलेली ट्रीप आवडते. हवामान-ऋतूंप्रमाणे पर्यटनाची ठिकाणे बदलतात. प्रत्येक ठिकाणी जायचा प्रत्येकाचा उद्देश वेगळा... केवळ नवीन आणि प्रसिद्ध जागा पहाण्याबरोबरच करमणूक, प्लेजर, साहसी किंवा स्पोर्ट्स ( ट्रेक, डायव्हिंग, बंगी जंपी...

एक तरी मुलगी असावी

Image
 कन्यादिनानिमित्त... एक तरी मुलगी असावी एक तरी मुलगी असावी उमलताना तिला पहावी नाजूक नखरे करताना न्याहाळायला मिळावी एक तरी मुलगी असावी साजिरी गोजिरी दिसावी नाना मागण्या पुरवताना तारांबळ माझी उडावी एक तरी मुलगी असावी मैचिंग करताना तिला बघावी नटता नटता आईला तिने नात्यातली गंमत शिकवावी एक तरी मुलगी असावी जवळ येऊन बसावी मनातली गुपितं तिने हळूच कानात सांगावी एक तरी मुलगी असावी गालातल्या गालात हसावी कधीतरी भावनेच्या भरात गळ्यात मिठी मारावी……! एक तरी मुलगी असावी मुलगी नाही ... दुःख नाही... पण काहीतरी कमी आहे याची कुठंतरी जाणीव आहे इतरांचे नशीब घेऊन येण्यात मुली तशा माहीर आहेत मुलगी म्हणजे धनाची पेटी हे सत्यही तसं जग जाहीर आहे.. राहुल लाळे

शहेनशहांचा शहेनशहा

Image
 ' शहेनशहांचा शहेनशहा’ राहुल हा ‘शहेनशाह’, ‘दि ग्रेट गेंबलर’, ‘खुद्दार’, ‘देशप्रेमी’च नाही ‘महान’नायक आहे, जो ‘कभी-कभी’ ‘मजबूर’ ‘एकलव्य’ ही होता.   ‘अग्निपथ’ वर हा ‘आज का अर्जुन’ बनून या   ‘नमक हलाल’  ने ‘गंगा की सौगंध’ घेत  ‘नि:शब्द’ ‘आखिरी रास्ता’ पार पाडत  ‘मुकद्दर का सिकंदर’ बनला. याच्या ‘नसीब’ने या  ‘अजूबे’, ‘जादूगर’ ला कधी  ‘डॉन’ बनवून  ‘जंजीर’ मध्ये  ‘गिरफ्तार’ केलं  तर कधी ‘शराबी’ समजून  ‘जुर्माना’ लावत  ‘अंधा कानून’ च्या  ‘खाकी’ वर्दीच्या  हवाली केलं.  आयुष्यात कितीही चढ उतार  झाले तरी  ‘कभी खुशी कभी गम’ ची  ‘दीवार’ या  ‘मर्द’ माणसाच्या  ‘जमीर’च्या  ‘शान’ ला  ‘ब्लैक’ करू शकली नाही.  या  ‘कालिया’ च्या यशाचा  ‘सिलसिला’ ‘सात हिंदुस्तानी, ‘अजूबा ', ‘अमर अकबर एंथनी’, ‘गंगा जमुना सरस्वती, ‘बॉम्बे टू गोवा’ पर्यंत अजूनही गायला जातो. ‘आनंद’ ने ‘खून-पसीना’ गाळला  नसता तर तो  ‘अकेला’ ‘हेरा-फेरी’ करून सुद्धा  ‘कुली’ च्या पुढं  पाऊल ...

पुलवामा

Image
  पुलवामा राहुल सीमेवर रक्तफुले ते उधळती अन इथे जनांना गुलाब रिझवती त्यांनाही खुणावले असेल त्यांच्या फुलामनांनी असतील निघाले भेटीला त्यांच्या  व्हॅलेंटाईनला तेही नतद्रष्ट नराधमांनी घातला घाला अन रक्ताची सांडवण केली मर्दांचा या बदला घेतील आपलेच इतर जवान बंधू या जवानांच्या कुटुंबियांना भरभक्कम पाठिंबा देऊ अन् शत्रूला धडा देण्या सर्व एकत्र येऊ हीच त्यांना आज सुमनांजली  राहुल लाळे

भाई...व्यक्ती का वल्ली..... का आणि काही?*

Image
 * भाई...व्यक्ती का वल्ली..... का आणि काही?* राहुल लाळे पु.ल. - लहानपणापासूनचं कौतुकाचं, टिपिकल महाराष्ट्रीयन अभिमानाचं नाव...अनेकदा वाचलं तरीही परत परत वाचलेली त्यांची पुस्तके, माहिती. लेखक, शिक्षक, नाटककार,  नाटक सिनेमातला प्रथितयश नट, चांगला व्यक्ता, संगीतकार, उत्कृष्ट हार्मोनियम वादक आणि काय काय म्हणून आपण त्यांना ओळखतो. आवडता लेखक म्हणून पहिलं नाव त्यांचच. तशात या त्यांच्या जन्मशताब्दी वर्षी व्हॉट्सऍप वर त्यांच्याबद्द्लच्या अनेक खऱ्या , काही दंतकथा, ऍनिमेशन्स यांमुळे गेले काही दिवस वातावरण पुलंमय झालं होतं. त्यात महेश मांजरेकरांचा भाई...व्यक्ती का वल्ली हा नवीन सिनेमा येतोय अशी दवंडी पेपर...टीव्ही वर चालू होती. कालपरवा मकरंद अनासपुरेंच्या कलर्स मराठी वरील कार्यक्रमात ही याच सिनेमावर चर्चा चालू होती... त्यामुळे लगेच आज सिनेमा पाहून आलो.   अगदी टायटल्सपासूनच जेव्हां सुनीताबाईंच्या मनोगतातून आणि पुलंच्या लहानपणापासून नंतरच्या मुद्रा ऍनिमेशन्स मधून उलगडत जाताना दिसतात तेव्हाच पुढे या खळखळ, निर्धास्त जगणाऱ्या, हसणाऱ्या-हसवणाऱ्या, प्रेक्षकांची गर्दी आवडणाऱ्या आणि रसिकांच्य...

सागर किनारी

Image
  सागर किनारी.... राहुल अनेकदा सागर किनारी थकवा घालवायला जातो अनवाणी पायांनी चालतो उडणाऱ्या पक्ष्यांचे आवाज ऐकतो डोलणाऱ्या होड्या दिसतात आणि मनात आठवणींच्या लाटा उसळतात दूर नभात दिवस उजाडताना पहातो थंड लाटांनी भिजून जातो पायात शंख शिंपले टोचतात आणि मनात आठवणींच्या लाटा उसळतात लाटांचे फेस जवळ येतात किनाऱ्याला मिठी घालतात सुसाट वाऱ्याबरोबर केसंच काय ताडमाडही हलतात आणि मनात आठवणींच्या लाटा उसळतात एका हातात चपला धरून काही शोधत.. लाटा पावलांवर झेलत मी चालत रहातो पण तसं काहीच दिसत नाही मला आणि गाजेशिवाय काही ऐकूही येत नाही... सगळे काही जसं  थांबलं आहे ...आणि ... मग मनात आठवणींच्या लाटा उसळतात भासते अचानक मला... त्या लाटा आत्ता पाण्याच्या नाहीत त्या  आठवणी आहेत ...जगलेल्या प्रत्येक क्षणाच्या  आदळत आहेत मनावर माझ्या .. एक एक करून असे वाटते किनारा कधी संपूच नये लाटा ह्या कधी थांबूच नयेत.. अन मग अचानक चालताना वाळूत  काहीतरी टोचते पायाला अन मी पुन्हा येतो ..भानावर...किनाऱ्यावर ओल्या लाटांमध्ये अन ..जाणवते किती लांब आलो मी निघून.. मग...मागे वळून बघतांना परत...  मनात आठ...

अळवावरचं पाणी

Image
  अळवावरचं पाणी...राहुल  अळवावरचं पाणी झोडणाऱ्या सरीत चिंब भिजायचं बरसणाऱ्या पावसात न्हाऊन जायचं स्वप्नात उमललेली फुलं प्रत्यक्षात फुलवायची दूर जाणारे ढग विसरुन जायचे झिरपणारे क्षण टिपत रहायचे मनाच्या ओलाव्यात आठवणी जपायच्या जीवलगांच्या साथीत मग आशा बहरतील अळवावरचं पाणी वाहून जाईल मायेचं माणूस साथीला राहील .© राहुल लाळे

वाट क्षितिजाची

Image
*वाट क्षितिजाची...* राहुल आकाशाला जमिनीशी भेटवणारी आभासी  रेघ.. क्षितिज जेवढे जवळ जाऊ तेवढंच लांब जाणारं...क्षितिज  उगवत्या मावळणाऱ्या सूर्याची आभा खुलवणारं..क्षितिज जमिनीची तहान भागवायला येणाऱ्या काळ्या ढगांची रुपेरी किनार...क्षितिज अथांग सागराला तेवढीच अथांग अथक साथ देणारं....क्षितिज उंच उंच पर्वतरांगा, नभांशी भिडणारं उत्तुंग.... क्षितिज आसुसलेल्या जमिनीला इंद्रधनूच्या कमानीनं आभाळाशी जोडणारं.....क्षितिज  सप्तरंगात जणू फुलणाऱ्या प्रेमाची क्षणिक भूल देणारं...क्षितिज जणू कुणी दोन स्वप्नाळू जीवांच्या मिलनाचं स्वप्नस्थान...क्षितिज कुणा भाववेड्या भक्ताचं अंतिम ठिकाण असंच एखादं भव्यदिव्य...क्षितिज प्रत्येकाचं आपलं कधी कवेत घ्यावंसं, तर कधी विस्तृत करावंसं वाटणारं...क्षितिज भास असूनही लोभसवाण्या भेटीची आस दाखवणारं...क्षितिज अशाच एका सुंदर क्षितिजाकडे घेऊन जाणारी ही सुंदर वाट.. प्रत्येकाला अशीच सुंदर वाट मिळावी...आणि मिळावं आपापलं ...क्षितिज राहुल लाळे ०५-१०-२०२०

तो येतोय...श्रीगणेश

Image
 *तो येतोय* राहुल लाळे  तो येतोय या वर्षी ही तो येतोय संकटातून, रोजच्या विवंचनेतून  सर्वांना बाहेर काढायला  विघ्नहर्ता येतोय शिवपार्वतीचा हा पुत्र दुर्मुखलेल्यांना उल्हसवायला येतोय भोळाभाबडा रिध्दीसिध्दीचा दाता हिरमुसल्यांना खुलवायला येतोय धकाधकीच्या जीवनात स्वास्थ्य भरायला येतोय गजबजलेल्या रस्त्यांवर  चैतन्य भरायला, उदास मनाला  आश्वासायला तो येतोय.. मोदक, निवगिऱ्या , आणि  नाना खाद्यपदार्थ घेऊन भूक भागवायला तो येतोय गर्वाचं हरण करायला सेवेचं व्रत शिकवायला दुःखहर्ता तो येतोय भक्तीची सवय जोडायला शक्तीची आठवण करून द्यायला तो पुन्हा येतोय आज त्याला नकोय कसलीच गडबड  नकोय त्याला आज ,अजिबात गोंधळ सणांचं पावित्र्य राखा,  असं तो बजावतोय गर्दी करु नका , प्रेमानं दटावतोय स्वतःवर विश्वास ठेवा.  संदेश तो देतोय  काळजी करु नका...घ्या असंही सांगतोय जुने दिवस जातील  नवीन काहीतरी चांगलंच होईल ही आशा मनात ठेवायची सुखकर्त्याची त्या रोज आरती करायची त्याला नको सजावट  नको देखावा त्याला सर्वांगी सुंदर देव माझा फक्त भक्तीभावाचा भुकेला दहा दिवसांनी...

मनवाटा

Image
  ** * मनवाटा * ** राहुल मन गुंतले एवढे, जरा उसंत नाही देहास या माझ्या, विसावा म्हणून नाही जीवनी या माझ्या, संधी अनेक येती साधावयास त्यांना, वेळ अपुरा होई प्रवासात या माझ्या, अनंत वाटा काटेरी विश्वास, धैर्य अन् श्रध्दा, असती माझे सोबती प्रत्येक येणाऱ्या क्षणांत, भरपूर मी जगतो मिळणाऱ्या अनुभवांनी  समृद्ध मी होतो भेटतात रस्त्यात या, माणसे वाईट चांगली मिसळून त्यांच्यात मला, साथ छान मिळाली स्वार्थ मनात कुठलाच बाळगला कधीच ना मी लाज वागण्याची, अन् मला वाटली नाही जीवासवे जन्मे मृत्यू, सत्य जाणले मी कुठल्याही संकटाला मग, सामोरा भिडलो मी जखमा उरातल्या खोल, भरल्या माझ्याच त्या मी इतरांच्या दुःखावरही हळूवार फुंकरतो मी मनुष्य देह म्हणे हा, मिळतो महत्प्रयासाने मिळालेले आयुष्य हे, मी  जगेन आनंदाने                       - राहुल लाळे                      २ ऑक्टोबर ...

वाट आपली आपली

Image
  वाट आपली आपली वाटा तशा अनेक काही सरळ, काही वाकड्या काही नागमोड्या,  काही चढ-उताराच्या तर काही वाटा निसरड्याही.. काही वाटा अंधाराच्या काही लख्ख प्रकाशवाटा काही रहिवाटीच्या, काही अगदीच गुप्त तळघरातल्या.. काही वाटा फ़ुटतात, काही हरवतात,  काही वाटा मिळतात, काही सापडतात.  वाट कधी पाहिली जाते,  तर कधी वाट दाखवली जाते,  अन वाट लावलीही जाते.  कधी कधी आपल्या आपण वाट लागतेही. अनोळखी वाटा अनेकदा चोखाळल्या जातात कधीतरी त्या  जोखल्याही जातात कधी प्रवासात वाटा वेगळ्या होतात कधी वाट वाकडी करुन येणजाणं होतं अन कधी वाकड्या वाटेला जाण ही होतं.  कुणी आपापल्या वाटेने जात असतो,  कुणास वाट दाखविणारा भेटतो,  तर कुणी वाट अडविणारा असतो.  कुणी वाट राखतो, कुणी वाट मारी करतो.  कधी कधी  एखाद्या वाटेला जायच नसतं.. सरळ वाटेला धरुन कधी चालायचं असतं तश्या अनेक वाटा तुम्ही आम्ही खुप पाहिलेल्या असतात  पण स्वत:ची अशी एखादी वाट असतेच...नाही का?  माझी ही आहे..अशीच एक पाऊलवाट !!! आणि तुमची? राहुल लाळे २३-०९-२०२०