लग्नवाढदिवस
माझं मन तुझं मन ,
कधीतरी एक झालं
आशीर्वादांनी अनेकांच्या
सहजीवन सुरु झालं
प्रेमाच्या बहरण्याबरोबर
जबाबदारीचं भान आलं
पती पत्नीचं
संसारचक्र सुरू झालं
मनांनी दोघे एकत्र नांदून ,
दोन्ही कुटुंबांना धाग्यात बांधलं.
जोडायची रीत सांभाळून
अनेक परिवारांनाही बरोबर जोडलं .
तारेवरची कसरत असते
सगळ्यांना बरोबर नेण्याची
कधी रुसवा कधी गोडवा
यातंच तर मजा संसाराची.
माझ्या बेफिकीरीला
तुझ्या जाणीवांचा लगाम असतो
वाहणाऱ्या अश्रूंना तुझ्या
माझ्या खांद्याचा आधार असतो
कधी भांडण कधी समजावणी
कधी अबोला कधी मनधरणी
एक चिडला तर दुसरा शांत
कपातलं वादळही बशीत शांत
दोन जीवांतून एक जीव हळूच अंकुरला
जगण्याला एक वेगळाच अर्थ मिळाला
लग्नाचा अजब खेळ रंगला
मनामनाचा अप्रतिम मेळ जमला
आज २७ वर्षे आणि पुढे
राहुल लाळे...
०९.११.
Happy Anniversary
💐💐






Comments
Post a Comment