Posts

Showing posts from July, 2020

प्रवास - जगण्याच्या आनंदाचा

Image
* प्रवास - जगण्याच्या आनंदाचा* राहुल लाळे    #जिंदगी जिंदादिलीका नाम है मुर्दादिल खाक जिया करते है# इमाम बक्ष नासिख यांचा हा शेर लहानपणापासून ऐकत आलोय, त्यावर अनेकांनी लिहिलेलं , बोललेलं समजून उमजण्याचा आणि तसंच  जिंदादिल रहाण्याचा प्रयत्न कायम करतही आलोय . जिंदगी - जीवन म्हणजे काय फक्त आलेला दिवस पुढे ढकलत जगायचं ?- रडत भेकत - आपल्या त्रासांना कवटाळून जगायचं ?  दुसऱ्यांना मिळणारं सुख आपल्याला का मिळत नाही म्हणून कुढत जगायचं ? …का.. हसत खेळत , "मै जिंदगी का साथ निभाता चला गया - हर फिक्र को धुए  में  उडाता चला गया "  या मूड मध्ये  राहून " जिंदगी एक सफर है सुहाना - यहाँ कल क्या हो किसने जाना " हे जाणून घेऊन आजचा दिवस - आजचा क्षण माझा.. म्हणून आयुष्य पुरेपूर जगायचं ?  काय नक्की असावं ? माणसाचं जगणं आणि पशु-पक्षी-किडे मुंगी यांच्या जगण्यात फरक काय तो भावनांचा , मग हे पशु पक्षी  जर आपले  आयुष्य मजेत घालवत असतील तर मग आपलं जीवन  आपण खुश होण्यासाठी किंवा नैराश्याच्या खाईत - किरकिरत जगण्यासाठी आपल्या भावनांवर का अवलंबून आहे ?  याच...