इस्रो..संपर्क

 *संपर्क तुटेल, संकल्प नाही...*




संपर्क तुटला, संकल्प नाही

खचून जाणारे आम्ही नक्कीच नाही


*विक्रमाने* हुलकावणी दिली

तरी *प्रज्ञाना* ची साथ सोडणार नाही


चंद्राचे आहे जुनेच आकर्षण..

श्रीरामाला ही त्याने घातली भुरळ

प्रेमाचे आमच्या तो प्रतीक आहे

शास्त्रज्ञांसाठी कुतूहल आहे


हनुमंताचे भक्त आम्ही 

चंद्रच काय सुर्यालाही गवसणी घालू

वेडे प्रेमवीर आम्ही

पुन्हा पुन्हा फिरुन येऊ


तो तिथेच कायम असेल

 निर्धार आमचा दशपट होईल


संपर्क तुटेल, संकल्प नाही

खचून जाणारे आम्ही निश्चितच नाही


राहुल लाळे

०७-०९-२०१९

Comments

Popular posts from this blog

धुरंधर

द बंगाल फाईल्स

नोव्हेंबरमधील धार्मिक पर्यटन .. गिरनार - सोमनाथ - द्वारका