Posts

Showing posts from April, 2020
Image
*महिन्याभराचा लॉकडाऊन आणि मी* राहुल लाळे  लॉकडाऊन सुरु होऊन महिना उलटून गेला - शैक्षणिक ,आर्थिक, सामाजिक, औदयोगिक , व्यावसायिक सर्वच क्षेत्रात  कसं सारं  स्तब्ध झालंय असं वातावरण आहे .. शेअर बाजार कोलमडलाय -पुढं काय होणार ? आपलं - कुटुंबाचं -आपल्या व्यवसायाचं -कंपनीचं -देशाचं अशा अनेक शंका मनात अनेकांना येऊ लागल्या . त्यातून सोशल मीडियावर अनेक  बातम्या ,पोस्ट्स,जोक्स , क्लिप्स -अफवा यायला लागल्या - त्याही आता जुन्या झाल्या  मार्चच्या २१ तारखेपर्यंत ऑफिस चालू होतं. आणि शासनाच्या निर्णयामुळे २२ तारखेपासून अचानक वर्क फ्रॉम     होम सुरु झालं.. ३१ तारखेपर्यंत चालू रहाणारं लॉकडाऊन पुढे १४ एप्रिलपर्यंत आणि नंतर आता ३ मेपर्यंत वाढवलं गेलंय. पहिल्या आठवड्यात दोन  वेळेला आणि  नंतरही एरिया सील झाल्यावरही अगदी  ऑफिसकडून मिळालेली कलेक्टरची परवानगी आणि पोलिसांकडून येणारा  कोड घेऊनही दोन वेळा कंपनीत जाऊन आलो. सुरवातीच्या काही दिवसांनंतर  WFH बरोबर ऑफिसच्या झूमवर अनेक मिटींग्ज,वेबिनार्स इत्यादी चालूच आहे - त्यामुळे कंपनीच्या कामाशी...
Image
उंच हरित तरुतल छाया तयांची थंड शीतल शांत जलाशय कोमल कमलदल सुंदर अन किती निर्मळ  हवेबरोबर पानांची मर्मर  काही खाद्य असावे बरोबर अन् मादक  सुरा पात्रभर  प्रेमिका जर बरोबर असेल  गाईन मी एक गीत सुरेल संध्या ही अशी असावी मधुर  फुलेल मग जीवन तसंच सुंदर राहुल लाळे