देऊळ ... कुणाचं ... कुणासाठी?
देऊळ ... कुणाचं ... कुणासाठी? राहुल लाळे "शोधू कुठं ?... देवा तुला शोधू कुठं ?" हा प्रश्न सर्वच देवभक्तांना असतोच, पण तसाच तो अनेक अभ्यासक, चिकित्सक , आस्तिक-नास्तिकांनाही असतो. याच प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी " देऊळ" हा चित्रपट दिग्दर्शक उमेश कुलकर्णी आणि देविशा फिल्म्सचे निर्माता अभिजित घोलप यांनी काढला असावा.- सिनेमा ते उत्तर देतो का नाही - हे सिनेमा पाहूनच प्रत्येकानं ठरवावं. कथा -पटकथा लेखक आणि या चित्रपटाचा नायक गिरीश कुलकर्णी आणि इतर कलाकार व सर्वच टीम हे उत्तर शोधायला आपल्याला मदत करतात . नाना पाटेकर, दिलीप प्रभावळकर, सोनाली कुळकर्णी, मोहन आगाशे, ज्योती सुभाष, उषा नाडकर्णी, किशोर कदम, विभावरी देशपांडे, हॄषिकेश जोशी, श्रीकांत यादव, अतिषा नाईक, नासिरुद्दीन शाह[ आणि गिरीश व इतर कलाकारांची नावं ऐकूनच सिनेमा पाहायचं नक्की केलं होतं. आणि तो पाहून झाल्यावर काही उत्तरं मिळाली आणि बरेचसे प्रश्न ही मागे लागले... सिनेमा सुरु होतो तो - एका मंगरूळ गावातलया केशव- केश्या (गिरीश कुलकर्णी) त्याच्या हरवलेल्या गाईला (करडीला ) हाका...