Posts

Showing posts from July, 2024

विठूची रखमाई

Image
 *विठूची रखुमाई...* राहुल रखुमाई नाजूकशी सावळा रांगडा विठ्ठल जोडी जमली कशी मला पडे नवल नाथांच्या घरी  हा भरे पाणी जनीच्या मागे धावे शेण्या उचलूनी कबिर गाई दोहे हा विणतो शेला  नाम्यासाठी हा उष्टावतो काला ज्ञानोबांसाठी हा भिंत चालवतो तुकोबांचे बुडलेले अभंग वाचवतो दामाजीनी गरीबांसाठी  रीती केली कोठारे  विठू महार होऊनी हा परत ती भरे चोखामेळा , गोरा कुंभार याच्या भक्तांची किती गणती आस लागलेल्या बायकोची याला नसे काही भ्रांती काळाचेही रहात नाही  याला काही भान वाटेकडे डोळे रख्माईचे लावूनी तनमन भक्तांच्या हाकेला हा सदा धावून जातो शेजारच्या रखमाईला मात्र विसरुनी जातो मुलखाची भाबडी माय भोळ्या भक्तांची भाळली काळ्यावर युगत ना कळली तयाची विठूसंगे नाव सदा येते रखुमाई बरोबर असून नसे जवळ रुसतसे बाई याच्यासंगे राबे ही सर्व भक्तांच्या घरी बोल कोणा लावावा तिचाच तो सावळा हरी.... ©राहुल लाळे
Image
 *गुरुपौर्णिमा... गिरनार दर्शन* राहुल  आज गुरुपौर्णिमेनिमित्त गिरनारला श्रीदत्त गुरुंच्या दर्शनाचा योग आला. गुरुपौर्णिमेच्या शांत शीतल चंद्रप्रकाशात व मध्येच मेघांनी आच्छादून टाकणाऱ्या भारावून सोडणाऱ्या आसमंताच्या सान्निध्यात साडेदहा वाजता तलेटीत लंबे हनुमानाला नमस्कार करून नारळ फोडून गिरनार चढायला सुरुवात केली आणि दहा हजार पायऱ्या चढून गुरुशिखरावर श्रीदत्त गुरुंचे दर्शन घेतले. हजार एक पायऱ्या उतरून कमंडलू क्षेत्रात पहाटे अखंड धुनीचे दर्शन व प्रसाद ग्रहण करून पर्वतावरील गोरक्षनाथ व अंबामाता मंदिरांचे दर्शन घेऊन  पहाटे परत दहा हजार पायऱ्या उतरून आलो. गुरुपौर्णिमेचा अनेक वर्षांचा संकल्प आज सुटला ©राहुल लाळे

गवतफूल

Image
 गवतफूल....फूलमाणूस.....                            राहुल गवतफूल लोकांचे मत .. कधी वाईट, कधी चांगलं... मर्जी त्यांची ...  बसवतील कधी डोक्यावर तर कधी घेतील पायदळी... मर्जी त्यांची.. फूलानं मात्र त्याचं ...फूलपण जपावं बागेला फुलवावं, रानात सजावं माळून घ्यावं कधी ललनेच्या केसात.. गुंफून घ्यावं हारात, कधी सुंदर गजऱ्यात समर्पावे ईशचरणी, तर कधी कलेवरी कमळ फुलतं, फुलतो गुलाबही  फुलुदे ना मग गवतफूलही माणसानंही फुलाकडून काही शिकावं जावे तिथे सुगंध पसरवावा बरोबर आपल्या इतरांना खुलवावे मळभ मनांचे दूर करावे अर्पित करावे माझे मीपण करावे  सुगंधित सारे जीवन होता ऐसं समर्पित जीवन एक क्षणंच काय ... युगानुयुगे होईल स्मरण मग कोणी काही करो, काही म्हणो... मर्जी त्यांची ©राहुल लाळे ०४-०७-२४ Photo courtesy...Sunil Vishwas 

गुरुपौर्णिमा ...माझ्या आयुष्यातले गुरु… सुश्री मंजुश्री ओक*

Image
 *गुरुपौर्णिमा ...माझ्या आयुष्यातले गुरु… सुश्री मंजुश्री ओक* राहुल गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः  गुरुर्देवो महेश्वरः, गुरुः साक्षात्‌ परब्रह्म,...  तस्मै श्री गुरवे नमः॥🙏🏻 गुरुरादिरनादिश्च गुरू: परमदैवतं । गुरो: परतरं नास्ति.... तस्मै श्रीगुरवे नम: ।। गुरुतत्व हे अनादी अनंत आहे. गुरू हेच श्रेष्ठ दैवत आहे. गुरुहून श्रेष्ठ दुसरे काही नाही. गुरूंना नमस्कार करून परवा मंजुश्रीची मुलाखत सुरु केली आणि तिच्या संगीत साधनेच्या विविध टप्प्यांवर तिला लाभलेल्या अनेक महान गुरुंच्या कथा - अनुभव ऐकून खरोखर भारावून गेलो .  पं हृदयनाथ मंगेशकर, खय्यामजी , ओ पी नय्यर, अरुण दाते - सुरेश वाडकर -रवी- राम कदम - आनंदजी - गुलशन बावरा - जॉली मुकर्जी - मनोहरीसिंग - शिवकुमार शर्माजी यापैकी कोणी एक जरी आपल्या आयुष्यात एक दिवस जरी संपर्कात आला तरी तो दिवस सुवर्णमय होईल. मंजुश्रीला तर हे  एकाहून एक दिग्गज कलाकार गुरु-मार्गदर्शक म्हणून लाभले - हे कल्पनातीत आहे - जणू सर्व आयुष्याचंच सोनं झालं. आपल्या एकेका गुरूंबद्दल बोलताना मंजुश्रीचा एकेक शब्द अभिमानाने ओथंबून वाहत होता. मंजूकडून  एकेक ...