Posts

श्रीदेवी

Image
 श्रीदेवी ...  ऐ चाँद  पहले भी तुम्हे नाज़ था  अपनी चाँदनी पर .... तुम आज और खुश होगे इस जहाँ की चाँदनी जो अब तुम्हारे पास है जादा गुमान ना कर आज आसमानके नजारे पर ये तेरी रोशनी नहीं  हमारे चाँदनीकी चमक है राहुल

ख्रिसमस

Image
 🎄 ख्रिसमस ...भारतातला 🎄 राहुल गोठा किंवा कोठडीत जन्म घेऊन देव तो माणसात येतो.. येशु असो वा कृष्ण , संस्कृती- माणुसकी-कर्तव्य  शिकवतो.. दीन-दुबळ्यांचा संगती, प्रेमाचा जणू झराच तो बनतो    नको सोनं नको वैभव, नको तो राजस थाट करुणेच्या ओठीं फुलवू हास्य, हाच माणुसकीचा पाठ एक सारथी बने शिष्याचा, पाय धुतो दुसरा भक्तांचा जीवन ते जगले शिकवत पाठ नम्रता, समतेचा माझे कर्म माझा धर्म , क्षमा - सेवा यांची धरावी वाट दुर्जनांचा अंत व्हावा , अंतरीचा द्वेष वितळून ..यावी शांततेची पहाट घंटा-मेणबत्त्या, शंख- पणत्या सारे  काही एकच सांगतात.. मैत्र, प्रेम, सुखसमाधानाचा प्रकाश पसरवतात. दिवाळी असो वा नाताळ, उत्सव असतो दिव्यांचा मनातला अंधार दूर करा हा संदेश मिळण्याचा... ©राहुल लाळे

धुरंधर

Image
  # Dhurandhar #Facts and Fiction धुरंधर ... अज्ञात वीरांची थरारक धैर्य गाथा फॅक्ट आणि फिक्शन राहुल लाळे हल्ली मोबाईल - इन्स्टा - फेसबुकवर रील्स बघताना - किंवा OTT वर सिनेमा किंवा एखादी सिरीज स्किप बटन वापरून फास्ट फॉरवर्ड करत पहाण्याची सवय झालेली असताना साडेतीन तासापेक्षा जास्त लांबीचा असलेला आदित्य धीरचा " धुरंधर" हा सिनेमा  आठवडयात दुसऱ्यांदा  पुन्हा काल बघितला यातच हा सिनेमा एवढा का चाललाय हे कळतं !  एव्हांना  सर्वांना या सिनेमाची स्टोरी सर्वांना कळलीच असेलच त्यामुळे त्याबद्दल लिहिण्यात आता हशील नाही. पण तरीही लिहिण्यासारखं बरंच आहे म्हणून हा प्रपंच !! " Elephant in the Room !"  ही एक म्हण आम्ही कॉर्पोरेटमध्ये  सारखी वापरतो -  एखादा मोठा विषय असतो - पण त्याबद्दल कोणीच बोलत नाही. सत्य वेगळंच  असतं , पण ते काहींना अडचणीचं वाटतं - त्यामुळे त्यावर स्पष्टपणे न बोलता त्याबद्दल सगळं गुडीगुडी -- छानछान बोललं जातं. तसाच एक प्रश्न - विषय म्हणजे "भारताचा इतिहास" आणि गेल्या शतकातील  " भारत-पाकिस्तान " यांच्यातील संबंध !!!  आणि त्यावर निघाले...

नोव्हेंबरमधील धार्मिक पर्यटन .. गिरनार - सोमनाथ - द्वारका

Image
नोव्हेंबरमधील धार्मिक पर्यटन ..  राहुल लाळे गिरनार - सोमनाथ - द्वारका     * दिवस पहिला*   १ - २ नोव्हेंबर एखाद्या गोष्टीची ओढ लागणं म्हणजे काय ते ती ज्याला लागते , त्यालाच कळते. शाळेत असताना मधल्या सुट्टीची -   शाळा सुटल्यावर घरी जायची- अभ्यास संपल्यावर खेळायला जायची -परिक्षा संपल्यावर मे महिन्याच्या - दिवाळीच्या सुट्टीची ओढ असायची. वयाच्या प्रत्येक टप्प्यावर कोणत्या ना कोणत्या प्रकारची ओढ प्रत्येकाला लागतेच. आईला दूर असलेल्या मुलांच्या भेटीची , प्रियकराला प्रियेची , मित्रांना स्नेहसंमेलनाची , गरीबांना न्याय , समता -   विकासाची , समृद्धीची. आषाढ आली की वारकऱ्यांना वारीची.. भक्तांना आपापल्या श्रध्दास्थानांची... अशी ओढंच माणसाला जगायचा मार्ग दाखवते..नवी उर्जा देते.     अशीच उर्जा मिळवण्यासाठी अनेक ठिकाणं पहाण्याची , अ नेक उपक्रमात सहभागी होण्याची मला आवड लागली असावी. त्यामुळे सुट्टी काढून बाहेर छोट्या मोठ्या पर्यटनाला जाणं नेहमीचंच. गेली काही वर्षं चैत्री पाडवा आला की उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमा , आषाढ आला की वारी , गुरुपौर्णिमा आली किंवा ...