*ऑक्टोबर* राहुल लाळे Oct 2018 आज शुजीत सरकार / वरुण धवनचा " ऑक्टोबर" पाहिला. जेमतेम २ तासाचा सिनेमा, एकही गाणं नाही, मारधाड - पाचकळ विनोद किंवा नेहमीच सवंगतेचा फिल्मी मसाला नाही. विषय मेलोड्रामाकडे झुकणारा असला तरी मेलोड्रामाही नाही. वरुण सोडला तर सिनेमातले कलाकारही नवीनच, तरीही २ तास कसे गेले कळले नाहीत. सिनेमाची स्टोरी, तिचा पसाराही फार काही विस्तारित / मोठा नाही. दिल्लीतल्या द्वारकामधील रॅडिसन या फाईव्ह स्टार हॉटेलमधील शिकाऊ शेफ्स - त्यातलाच एक दानिश -डॅन (वरुण), त्याचे रूम पार्टनर मित्र आणि मैत्रीण आणि इतर शिकाऊ उमेदवार - त्यातलीच एक शिऊली अय्यर (नवोदित बनिता संधू) . वरुण एक रुटीन न पाळणारा , थोडासा विद्रोही - अगदी गमत्या नाही पण फार सिरीयस ही नाही असा - टॉवेल्स - बेडकव्हर्सवर नाचणारा-हॉटेलमध्ये येणाऱ्या घमंडी गेस्ट च्या पर्सनल गोष्टी उघड करून त्यांना कधी कधी ऑकवर्ड करणारा - बार मधील ड्रिंक्सच्या बाटल्या लंपास करणारा - आणि त्याबद्दल बऱ्याच वेळेस बोलणी खाल्लेला . त्याच्या उलट शिऊली - ज्युनियर असूनही सिन्सियर . त्या दोघांत प्रेम सोडाच ...