Posts

Showing posts from December, 2023

एक मस्त वीक एंड.

Image
 एक मस्त वीक एंड...झपूर्झा.. पुणे पुस्तक महोत्सव  शनिवारी मला सुट्टी असतेच पण बायकोला नाही... सोमवारी ख्रिसमस त्यामुळे तिला यावेळी सलग तीन दिवस सुट्टी मला मात्र सोमवारी ऑफिस आहेच.. पण शनिवार रविवारची एकत्र आलेली  सुट्टी कारणी लावलीच.. शनिवारी खडकवासला धरणाच्या, पिकॉकबेच्या थोडंसं पुढे  असलेल्या कुडजे येथे पीएनजी ज्वेलर्सने उभं केलेल्या "झपूर्झा" या कला व संस्कृती संग्रहालयास भेट दिली. जीवनाला समृध्द व संपन्न करण्यात कला व संस्कृती यांचा वाटा खूपच मोठा आहे आणि आपल्या देशाला तसंच महाराष्ट्रालाही विविध कलांचा तसंच संस्कृतींचा मोठा वारसा लाभला आहे. हा वारसा जतन करण्यासाठी सरकारबरोबर अनेक नामवंत संघटना, संग्रहालयं कार्यरत आहेत... झपूर्झामधे देखील या कलांची व संस्कृतींची ओळख करून घेतानाच त्यासोबतच आवडही निर्माण होते व एका छोट्याशा पर्यटनाचा आनंद ही मिळतो. झपूर्झात वेगवेगळ्या विषयांवर आधारित वस्तू प्रदर्शन करणारी दहा गॅलरीज.. कलादालनं आहेत. तीत भारतातील प्रसिद्ध कलाकारांची.. रविवर्मा, रविंद्रनाथ-अबनींद्रनाथ-गगनेंद्रनाथ टागोर, चुगताई, आबालाल रहमान, प्रभाकर कोलते, बाकरे, एन ए...

याना केव्हज्

Image
याना केव्हज् राहुल लाळे लहानपणी भस्मासुराची गोष्ट ऐकली होती...भस्मासूर शंकराची भक्ती करत तपश्चर्या करतो आणि शंकर जेव्हा प्रसन्न होऊन वर देतो... तेव्हा मागतो काय तर ज्याच्या डोक्यावर हात ठेवेन त्याचं भस्म होऊ दे. मग काय चालला गडी याच्या डोक्यावर हात ठेव...त्याच्या डोक्यावर हात ठेव.....नंतर तर वर देणाऱ्या दस्तुरखुद्द शंकराच्या डोक्यावर हात ठेवायला निघाला गडी...शंकरबाप्पा काही गडबडला नाही... पण त्यानेच नेहमीच्या भोळेपणाने  वर दिला असल्याने स्वतः काहीच करु शकत नसल्याने त्याने श्रीविष्णूंना पाचारण केले...विष्णू ही आले मोहिनीरुपात भस्मासुराला मोहित करायला... मग काय मोहिनीच्या रुपाने वेड लागून करतोय भस्मासुर ती करेल तसं...ती धावतेय हा धावतोय...ती हसली का हा हसला... ती नाचायला लागली हा ही...नाचता नाचता तिनं जेंव्हा स्वतःच्याच डोक्यावर हात ठेवला तेंव्हा या गड्यानंही तेच केलं की...मग काय झालं भस्मं...काळं...राख आता तुम्ही म्हणाल राहुलला काय झालं...ही माहिती असलेली पुराणातील गोष्ट परत काय सांगतोय...आणि वर नाव याना केव्हज्. तर झालं असं की...कोस्टल कर्नाटकात भटकंती करायला जाताना कित्तूर......