Posts

Showing posts from February, 2023

औदुंबर

Image
 १३ ऑगस्ट आज बालकवींचा जन्मदिवस *औदुंबर...* बालकवींची एक अजरामर रचना #राहुल लाळे ऐलतटावर पैलतटावर हिरवाळी घेऊन निळासावळा झरा वाहतो बेटाबेटातून. चार घरांचे गाव चिमुकले पैलटेकडीकडे शेतमळ्य़ांची दाट लागली हिरवी गरदी पुढे. पायवाट पांढरी तयातुनि अडवीतिडवी पडे  हिरव्या कुरणामधुनी चालली काळ्या डोहाकडे. झाकाळुनी जळ गोड काळिमा पसरी लाटांवर  पाय टाकुनी जळांत बसला असला औदुंबर फक्त आठ ओळींची कविता... पण मला वाटतं सर्वात जास्त वाचली-चर्चिली गेलेली- चेतनागुणोक्ती अलंकारात बांधलेली बालकवींची वरवरनं पाहिलं तर एक  फारच छान निसर्ग कविता... एखाद्या रसिक चित्रकाराने त्याच्या जादुई कुंचल्यातून काही फटकाऱ्यातूनच उतरवलेलं जणू एक सुंदर चित्र...निळासावळा झरा, शेतमळ्यांची हिरवी गर्दी, पांढरी पायवाट व काळा डोह- अशा विविध रंगांची उधळण किती विलक्षण रंगदृष्टी !! पण फक्त एवढाच अर्थ असावा? ऐल तटावर पैल तटावर, आडवीतिडवी पायवाट, झाकळुनी जळ गोड काळिमा,चिमुकले गाव, निळासावळा झरा, दाट हिरवी गरदी ,जळात बसला असला औदुंबर किती गोड शब्द, सुंदर लय, छान अनुप्रास साधला आहे. एकदा सांगलीला जाताना मुद्दाम वाळव्याल...

मराठी राजभाषा दिन

Image
* मराठी दिन का दीन? ...* दीन नक्कीच नाही राहुल लाळे… गेली काही वर्षे, जागतिक मराठी दिन २७ फेब्रुवारीला किंवा जागतिक मातृभाषा दिनी अनेक चांगल्या पोस्ट्स, कविता, चित्रं पहायला मिळतात. छान वाटतं.  कोणी म्हणेल आजंच का मराठी... रोज का नाही?  खरंच मराठी रोजच का नाही?.....कमीत कमी मराठी माणसासाठी तरी? आणि असंही  वाटलं...  की काय हरकत आहे?  मराठी दिन साजरा करायला ? आपण रोज थोडेसे वाढत असतो- मोठे होत असतो पण तरी वर्षातून एकदाच येणारा वाढदिवस आपण साजरा करतोच ना ? मग मराठी रोज  बोलणाऱ्या आपण मराठी जनांनी "गर्जा जयजयकार क्रांतीचा गर्जा जयजयकार!!!" असं लिहिणाऱ्या ज्ञानपीठ पुरस्कार मिळवून  मराठी भाषेची पताका गगनाला भिडवणाऱ्या ज्येष्ठ साहित्यकार "कुसुमाग्रज" वि.वा. शिरवाडकर यांच्या वाढदिवशी २७ फेब्रुवारीला जर मराठी दिन साजरा करणं ही तर अभिमानाचीच गोष्ट आहे की ? पण तरीही काही प्रश्न, विचार डोक्यात आले... "लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, मराठा तितुका मिळवावा , मराठी पाऊल पडते पुढे, इये मराठीचिये नगरी " इत्यादी फक्त काही जणांनी म्हणून , लिहून मराठीचा झेंडा खरंच  कि...