आठवणी दिवाळीच्या….
आठवणी दिवाळीच्या…. राहुल लाळे, मित्रांनो हे पूर्ण वर्ष कोविड १९ - करोना - लॉक डाऊन यात गेलं . आयुष्य अगदीच काही नीरस नाही पण थोडं थांबल्यासारखं मात्र नक्की झालं होतं . आता हळूहळू गाडी रुळावर यायला लागली आहे . गणपती झाले - नवरात्र - दसरा - कोजागिरी जाऊन आता नवा उत्साह घेऊन दिवाळी येतेय… गेले काही दिवस टिव्ही वर कॅडबरी , मोती साबण अशा अनेक खास दिवाळी स्पेशल जाहिराती सुरु झाल्या आहेत , त्या पाहून लहानपणी साजऱ्या केलेल्या दिवाळीच्या अनेक प्रसंगांची मालिका डोळ्या...