Posts

Showing posts from June, 2024

जागेश्वर

Image
  *जागेश्वर - १२ ज्योतिर्लिंगापैकी आठवे मानले जाणारे ठिकाण*  जागेश्वर धाम राहुल  ५ वर्षांपूर्वी बिनसर - अलमोडा - नैनिताल - कॉर्बेट अशी उत्तराखंड मध्ये भटकंती केली होती . बिनसरला गेलो असता १-२ दिवसांच्या तिथल्या लोकल भटकंतीनंतर जवळपास आणखी काय आहे ते पाहू असे सहज सर्च करताना सहज अल्मोड्यापासून ३० -३५ किमी अंतरावरती अति प्राचीन जागेश्वर नावाचे ठिकाण आहे कळले. नेटवर फोटो पाहिले आणि जायचेच  असे ठरले .   बिनसर -अलमोडा असे करत , मध्ये चहाच्या मळ्यातून वेगवेगळ्या फ्लेव्हर्सचा स्वाद घेत दुपारी जागेश्वरला पोचलो. बिनसर ते अलमोडा आणि पुढेदेखील ओक, पाईन  आणि निलगिरीच्या आणि इतर झाडांनी नटलेल्या पर्वतमय प्रदेशातून हिंडताना प्रवासाचा शीण असा जाणवलाच नाही . जागेश्वर  जवळ आल्यानंतर एक मोठा फरक -निसर्गाचा एक वेगळाच आविष्कार  जाणवला तो  म्हणजे त्याभागात बाकीची झाडे कमी होऊन देवदार वृक्षांची संख्या वाढलेली दिसली . म्हणूनच या भागाला बहुधा "दारुका वन " असेही म्हणतात असे ड्रायव्हर कडून कळले . प्रत्यक्ष जागेश्वराच्या आवारात १२५ हुन अधिक लहान मोठी देवळे आहेत आणि आसप...