Posts

Showing posts from December, 2019
Image
पानिपत ...फतेशिकस्त... अगदीच पानिपत नाही..आणि फते ही  राहुल लाळे इतिहास हा आवडता विषय , त्यामुळे ऐतिहासिक पुस्तकं  वाचण्याचा नाद लहानपणापासून - शिवाजी महाराज , मराठ्यांचा  इतिहास तर जिव्हाळ्याचा  विषय . बाबासाहेब पुरंदऱ्यांची शिवछत्रपतींवरची व्याख्यानमाला कमीत कमी  दहावेळा आणि त्यांचं राजा शिवछत्रपतीं हा ग्रंथ अगणित वेळा वाचलाय अजूनही वाचतो. लहानपणी टीव्हीवर ( आता का लागत नाहीत ?) भालजी पेंढारकरांचे  शिवकालीन सिनेमे आवर्जून पाहायचो - राजा शिवछत्रपतीं, नेताजी पालकर, बहिर्जी नाईक, मराठा तितुका मिळवावा, थोरातांची कमळा , धन्य ते संताजी धनाजी ... अनेक .. अगदी दादा कोंडकेंचा गनिमी कावा सुद्धा .. मध्ये अनेक वर्षे ऐतिहासिक सिनेमे निघालेच नाहीत . पण गेल्या काही वर्षात संजय लीला भन्साळी आणि आशुतोष गोवारीकर यांनी हिंदीत आणि नुकतंच  दिगपाल लांजेकर सारख्या नवोदिताने  मराठीत ऐतिहासिक चित्रपट काढायचं धाडस केलंय  - खरंच त्यांचं कौतुक आणि अभिनंदन. भन्साळीचा बाजीराव- मस्तानी गाजला पण पाहिला नाही ( बाजीराव  "दुश्मनची वाट लावली" म्हणताना ...