जोडी तुझी माझी
जोडी तुझी माझी राहुल लाळे परवा महाबळेश्वरला संध्याकाळची वेण्णा लेकपर्यंतची पायपीट संपवून मार्केटमध्ये शॉपिंग / विंडो-शॉपिंग करत हिंडत होतो.. वेगवेगळ्या वस्तूंनी भरलेली दुकानं, करोना च्या विळख्यातून, लॉकडाऊनच्या सावटातून बाहेर पडू पाहणारे पर्यटक-त्यांचा उत्साह पाहताना मजा येत होती. आम्हीही थोडीशी खरेदी करत मार्केट रोडवर भटकंती करत पुढे सरकत होतो. तेवढ्यात माझं लक्ष आमच्या थोडंसं पुढे चालत असलेल्या एका वृद्ध जोडप्याकडे गेलं. छान जरासे नवीन जमान्यातले पण आपल्याला शोभतील असे कपडे परिधान केलेले गप्पा मारत, हातात खरेदीच्या पिशव्या सांभाळत , हसत खेळत आणि मुख्य उत्साही निवांतपणे चालत होते ते. मी तारिणीचं(बायको) लक्ष त्यांच्याकडे वळवलं आणि आणखी १५-२० वर्षांनी आपणही असेच हिंडू या असं म्हणालो आणि पुढे गेलो. रात्री दिना हॉटेलच्या डायनिंग रूममध्ये पलीकडच्या टेबलवर त्याच आनंदी जोडीला डिनर करताना पाहिले - मार्केटमध्ये पाहिले होते तसेच - जे काही थोडे बोलतानाचे शब्द कानांवर पडले त्यावरून मंडळी मराठी आहेत हे कळले - थोडी जिज्ञासाही जागृत झाली. पण बोललो नाही - बायकोनंही दटावलं...