Posts

Showing posts from August, 2022

राधेचा कृष्ण

Image
 *राधेचा कृष्ण* राहुल राधेचा कृष्ण  कृष्णाची राधा  धागा प्रेमबंधाचा अनोखा डोळ्यातली स्वप्नं अनोखी  हररंगात एकमेकां रंगती श्वासात तिच्या ध्यास त्याचा प्राणाहून पूज्य मंत्र त्याचा आस भेटीची इतुकी जीवा पाण्यात पहाता स्वतःला प्रतिमेतही  पाही कान्हा © राहुल लाळे

वाढदिवस

 *वाढदिवस* राहुल वाढदिवस ... जाणीव करुन देतो, मोठं झाल्याची मन मात्र आठवण काढत रमतं.. लहानपणीची   आज संकल्प करायचा नवीन आशा आकांक्षांचा दिवस आज.. मागील वर्षांच्या अवलोकनाचा थोरामोठ्यांचे आशीर्वाद आज घ्यायचे मित्रमंडळींच्या शुभेच्छात न्हाऊन घ्यायचे मरगळ मनाची आज  झटकून टाकायची आस नवीन ध्येयाची कायमच धरायची वय, आयुष्य , दिनरातीचे जीवनचक्र चालतच राहूदे जोश-आनंद- उत्साह सदा वृद्धिंगत होऊ दे आज आपण सर्वांनी मला दिलेल्या शुभेच्छांसाठी मनापासून धन्यवाद !!! राहुल लाळे १६-०८-२०२२

या वयात सुध्दा

 *या वयात सुद्धा* राहुल  *या वयात सुद्धा* का हो... असा का पडावा  प्रश्न  ? या वयातंच  आहे की सगळं ... कारण... हे वय असं असतं,   जेंव्हा कशाचं भय नसतं स्वप्नं  सत्यात  आलेली  असतात कल्पना प्रत्यक्षात आणता  येतात  हे वय असं असतं, आपलं मन आपलं असतं दुसऱ्याच्या मनातलं जाणता येतं समोर कुणी नसलं तरी आपलं आपण रमू  शकतं उंच शिखरं, एखादी टेकडी आता कसलीच भीती नाही कधी उमेद कधी आराम कुणी काहीच म्हणणारं  नाही याच वयात ... नजरेतले भाव आता पटकन  लक्षात येतात हसणं-रडणं , खरं  खोटं लगेच सारं  कळून येतं   अनेक भोग भोगून शहाणपणा आलेला असतो निरागस आदर्शांना पोक्तपणाचा मुलामा चढलेला असतो बेपर्वाई सरली जरी  थोडा उनाडपणाही बाकी असतो एवढं सर्व असताना आता कशाला उगाच कुढत  रहायचं जसं जमेल - जेवढं झेपेल *या वयात सुध्दा* आयुष्य भरपूर जगून  घ्यायचं आयुष्य भरपूर जगून  घ्यायचं !!! *या वयात सुद्धा* राहुल लाळे