अमृतधारा

 अमृतधारा

रा.




बरसत रहाव्या या जलधारा

भासती या जणू अमृतधारा 

पाण्याविना कसे सारे शुष्क

चार सरीही देती अपार सुख


मेघ दाटता मोर नाचती

कडाडत्या विजा चमचम करती

पाऊस येता मंडूक डर्रावती

चातकही ते सुखावून जाती


हिरव्या शालूने नटू दे धरती

चिंब भिजू दे हिरवी पाती

मनांत दाटावी ओली प्रिती

अमृतधारांची किती ही महती


©राहुल लाळे🌈

११-०६-२०२२

Comments

Popular posts from this blog

धुरंधर

द बंगाल फाईल्स

नोव्हेंबरमधील धार्मिक पर्यटन .. गिरनार - सोमनाथ - द्वारका