जरा विसावू या वळणावर
जरा विसावू या वळणावर... भले बुरे जे... घडुन गेले... विसरुनी जाऊ ... सारे क्षणभर ... जरा विसावु...या वळणावर ... या वळणावर ....! लहान पणी केंव्हा तरी... नववी दहावी ला असतांना परीक्षा सं पल्यावर ... सुट्टीचं ...सकाळी झोपेत .... बाहेर की घरात ... रेडिओवर ...भले बुरे जे घडून गेले... विसरुनी जाऊ सारे क्षणभर ... हे गाणं हलकंस पहिल्यांदा कानावर पडलं...! हळूहळू ते गाणं कानात झिरपत होतं नी पडुन रहावसं वाटलं... ऐकत ... अर्थपू र्ण कडवे सगळे... सुरेख चाल ...! तेंव्हापासुन collection मधलं हे ही एक नितांत आवडीचं गाणं...! खरंच आहे... आयुष्यात किती तरी वळणे येतात ... कधी संकटातुन .. वेदनेतू न ...कधी आनंदात ... ही वळणं येतातच येतात .. मग ते वळण कौटुंबिक स्तरातील असो अथवा नात्या समाजातलं, मित्रपरिवार असो... किंवा कामाच्या ऑफिसच्या ठिकाणी...! अगदी शाळा, कॉलेज , शैक्षणिक वयातलं सुद्धा... पुढचा प्रवास बदलणारा असतो... हेच वळण जे निर्विकार असतं.. एक वाट संपुन दुसरं सुरू होणार असल्याचं एक अंतराळ ... अवकाश ...! भलं बुर...