Posts

Showing posts from May, 2021

न्यूड

Image
 *न्यूड*-  अंतर्मुख करायला लावणारा  अनुभव काल रवी जाधव यांनी दिग्दर्शित केलेला न्यूड पाहिला. दोन तीन महिन्यांपूर्वी एका फिल्म महोत्सवात नावामुळे ऐनवेळेला प्रवेश न मिळालेला आणि निगेटिव्ह पब्लिसिटी  मिळालेला आणि कालपरवा सर्वच वर्तमानपत्रात परीक्षकांनी उचलून घेतलेला चित्रपट म्हणून पाहायची उत्सुकता होतीच.  पहाताना बऱ्याच प्रसंगांनी अस्वथ तर झालोच आणि शेवटी सुन्नही झालो.  नग्नता, न्यूड हे शब्द आपल्या समाजात- घरात वर्ज्यच आहेत. ऐकले तरी एकदम हीन विनोदात किंवा साहित्यात- किंवा या शब्दाचा उल्लेख बातम्यात - कुठल्यातरी निषेध मोर्चात मग त्या एम एफ हुसेन यांच्या काही कलाकृतीसंदर्भात असतील किंवा मिलिंद सोमण- मधू सप्रे यांनी केलेल्या जाहिरातींबद्दल असतील - बेकर आणि त्याच्या कृष्णवर्णीय मैत्रिणीबद्दल असतील - प्रोतिमा बेदीबद्दल किंवा स्त्रियांवरील अत्याचाराविरुद्ध असतील. प्रत्येक वेळेस हा शब्द आला की एक मोठे वादळ उठतेच - कारण काहीही असो - याचे मूळही न्यूड या शब्दातच आहे - एकतर काही विधिनिषेध न बाळगता सामोरे येणारे ते सत्य - शिव किंवा सुंदर असतं .  या सिनेमाचं थोडंसं त...