Posts

Showing posts from February, 2020
Image
मिठी.... आलिंगन...किती छान शब्द आहे....आणि काय मनवतात तर म्हणे हग डे 😞 *मिठी ...* राहुल लाळे आयुष्यात सोबत      कायम तिचीच असावी बाहूंच्या कवेत येण्या      तिची कधी  ना नसावी ॥ १ ॥ नजरेत नजर खिळून राहावी  .    जरी दुभंगे धरणी विसरून  जाव्या  सर्व यातना        त्या  मोहक  क्षणी  ॥२॥ आलिंगनात या रुसवे- फुगवे       सारे विरून जावे गालावरच्या  खळीत तिच्या      मी स्वतःला हरवून जावे ॥३॥ करकमलांची ही मिठी      राहो वा ना राहो देह वेगळे झाले तरी    जीव एकमेकांत गुंतून राहो II४॥  ©राहुल  लाळे १२-०२-२०१९