*८० च्या दशकातील आर डी* आर डी बर्मनच्या वाढदिवसाच्या निमित्ताने ... मी पूर्वी संकलित केलेली पोस्ट- *८० च्या दशकातील आर डी* रा. १९८० च्या दशकात अमिताभच्या ऐंग्री यंग मॅन च्या कालखंडात सिनेमातील गाण्यांची मेलडी बरीचशी हरवली , रफी गेले आणि किशोरकुमार नवीन संगीतकारांकडे मेडीओकर गाणी गाऊ लागले . खय्याम ठराविक लोकांसाठी संगीत देत होते तर नौशाद - सलील चौधरी निवृत्त झाले . दाक्षिणात्य गाणी - ज्यात गाण्यात सूरताला पेक्षा P.T. च्या व्यायामाच्या संगीताचा बाज वाढला होता आणि आणि डिस्को फिवर मध्ये बप्पी लाहिरी आणि इतर अग्रेसर होते आर डी तसा अक्षरशः बिन कामाचा झाला कारण तडजोड करणे त्यांच्या स्वभावात नव्हते . तो गुलझार कडे काम करायचा ( लिबास , इजाज़त , नमकीन , मासूम व अंगूर ). त्याही वेळेस काही खास चित्रपट त्याने केले. उदाहरणार्थ - रमेश सिप्पीचा सागर , सनी देओल - सनी , मंझिल मंझिल - हरजाई , विधू विनोद चोप्रा चा परिंदा आणि त्याचाच आणि आर डी चा शेवटचा *"१९४२ अ लव्ह स्टोरी "* तीन ...
Posts
Showing posts from June, 2019