* खारी बिस्कीट ...सत्यातली स्वप्नं* राहुल लाळे एखादी गोष्ट मनाला मनापासून भावते.. बरेच वेळा ती बालीश, तर्कहीन असते, तरीही. दिग्दर्शक (आणि या सिनेमाचा कथाकार ही) संजय जाधवचा *खारी बिस्किट* हा सिनेमा असाच भावला. सिनेमा म्हणून काही त्रुटी आहेत पण त्यावर मात करणारा ऐन दिवाळीच्यावेळी भाऊबीजेला आलेल्या भावा बहिणीचा विषय आहे. , कथेत फार दम नाही पण जीवाला हात घालणारा भाव आहे...स्वप्न पहाणं आणि ती सत्यतेत आणण्यासाठी होणारी खरी धडपड दाखवलीआहे म्हणूनच तो आवडला. सिनेमाचं नावंच जरा विचित्र आणि आकर्षक - उच्चारताच मनात , डोळ्यासमोर एक चित्र येतं, जीभेला एका चुरचुरीत हवीहवीशी चव येऊ घालते तसंच काहीसं. आई खारी बिस्किटे विकायची म्हणून नऊ दहा वर्षीचा मुलगा 'बिस्कीट' आणि छोटीशी गोड बहीण 'खारी'. पण या गोड भावंडांचं आयुष्य आपल्या मुलांसारखं लाडाकोडातलं नाही. खारी जन्मतःच दृष्टिहीन , आईवडलांचं छत्र नाही, झोपडपट्टीत रहाणं असं कष्टदायी. पण धिटुकल्या बिस्किट ने धीर सोडलेला नाही. "जगात काही मिळवण्यासाठी फार लागत नाही, प्रेम पुष्कळ आहे आणि खारीला वाईट दुनिया कधीच दाखवायची न...