वटपोर्णिमा पुरुषांची

 वटपौर्णिमा....रा.



सगळे व्रतवैकल्य पूजाअर्चा फक्त बायकोनेच नवऱ्यासाठी करायच्या..

मग नवरा बायकोसाठी चार शब्द तर निश्चितच लिहू शकतो...


श्रमतेस दिवसभर तू

थकतेस माझ्या पायी

प्रेमिका होतेस कधी

कधी होतेस आई


असतेस माझ्या मागे

खंबीरपणे सदा तू

सांभाळतेस कुटुंब सारे

विसरून देहभान तू


जोडी तुझी माझी, विधात्याने सांधली

फुलबाग संसाराची, आपुल्या प्रेमातून सजली

कृतज्ञ आहे मी, नित्य त्याच्या पायी

विश्वास प्रेम माझे , सदा तुझ्या ठायी


©राहुल लाळे 🌈

Comments

Popular posts from this blog

धुरंधर

द बंगाल फाईल्स

नोव्हेंबरमधील धार्मिक पर्यटन .. गिरनार - सोमनाथ - द्वारका