*समिधा* राहुल समिधा.... ती लाकडाची समिधा किती नशीबवान आहुती होते तिची यज्ञात ... कधी सर्वकार्यसिद्धीसाठी , तर कधी रोगनाशासाठी कधी संततीप्राप्तीसाठी , तर कधी दीर्घायुष्यासाठी कधी मोक्षप्राप्तीसाठी तर कधी पाप मुक्तीसाठी मग सर्व मनोरथ पूर्ण करण्यासाठी झटणाऱ्या माझ्या सारख्या अगणित समिधांचं काय ? दोन गोष्टी लिहि किंवा छान कविता कर माझ्या मनाची भाषा कोणाला समजणार ? जिने आपल्या पदरात विश्वाला सांभाळलं तिला तू तुझ्याच इच्छेप्रमाणे वाकवलंस कधी सन्मानानं डोक्यावर बसवलंस कधी केरसुणीसारखं कोपऱ्यात ढकललंस आईचा मान देऊन पूजा केलीस कधी वासनांध होऊन पीडित केलंस कधी बहीण- मैत्रीण , कधी प्रेमिका -पत्नी हर एक रूपात मी सखी होते अंगणात पहाटेचा पहिला किरण झाले तुझ्या व्यक्ततेची कल्पनाही बनले माझे तेज घरादाराला देऊन मी मात्र विजून गेले कधी घनघोर अंधार , कधी डोळ्यात अश्रूंची धार कधी पेटता अंगार तर कधी फुलांचा शृंगार कितीही विचार केलास तरी रहस्य माझे सापडणार नाही माझ्या ओटीपोटातील गर्भ तू वाढवू शकणार नाहीस भरभरून वाहणाऱ्या भावनांची न...