थोडीसी बेवफाई
थोडीसी बेवफाई ... का कस्मे वादे ? राहुल लाळे मागच्या महिन्यात टीव्हीवर महेश भट्टचा शबाना-स्मिता पाटील - कुलभूषण खरबंदाचा "अर्थ" पाहिला. १९८२ साली आलेला हा सिनेमा फक्त प्रौढांसाठी असल्यामुळे पाहू शकलो नव्हतो - तेंव्हा फक्त त्यातल्या जगजीतसिंहांच्या "तुम इतना जो मुस्कुरा रहे हो- झुकी झुकी सी नज़र- कोई ये कैसे बता दे" अशा सदाबहार गजला ऐकायचो - पुढे मोठं होत गेलो तसं हा सिनेमा महेश भट्टने त्याच्या परवीन बाबीबरोबरच्या विवाहबाह्य संबंधांवर (एक्सट्रा मॅरिटल अफेअर) बनवला होता असं कळालं. पुढे हा सिनेमा प्रत्यक्ष पाहिला. पहिल्यांदा सिनेमा पाहिल्यानंतर त्यातल्या आपली बायको पूजाला ( शबाना) दूर करून कविताबरोबर (स्मिता) संबंध ठेवणाऱ्या इंदरचा (कुलभूषण खरबंदा) खूप राग आला होता. कविताबद्दल सहानुभूती-राग अशी मिश्र भावना आणि पूजाला कोलमडताना पाहून सुरवातीला वाईट-कीव आणि शेवटी तिला एक स्वतंत्र व्यक्तिमत्व बनून सावरताना पाहून एक कौतुकाची अभिमानाची भावना मनात निर्माण झाली. अशा संबंधांमुळे एका नात्यात तसंच लग्नसंबंधाबाहेरील त्या दुसऱ्या नातेसंबंधातही अनेक प्रश्न तयार होतात - अशा ...