Posts

Showing posts from September, 2025

द बंगाल फाईल्स

Image
 द बंगाल फाईल्स ... इतिहासातून वर्तमानात राहुल लाळे " पन्द्रह अगस्त का दिन कहता- आज़ादी अभी अधूरी है" ही अटलजींची कविता अनेकदा ऐकली आणि अग्रेषितही केली. त्यातली "कलकत्ते के फुटपाथों पर जो आंधी-पानी सहते हैं...उनसे पूछो, पन्द्रह अगस्त के बारे में क्या कहते हैं॥" ही ओळ कायम खटकायची. त्यामुळे कलकत्ता आणि १५ ऑगस्टचं काय नातं आहे हे शोधण्याचा बराच प्रयत्न केला तेंव्हा भारताच्या स्वातंत्र्याआधी तेंव्हाच्या बंगालमध्ये कलकत्ता आणि नौखालीमध्ये दंगली झाल्या होत्या एवढीच थोडीशी माहिती कळाली होती. पण परवा विवेक अग्निहोत्री-पल्लवी जोशी या जोडप्याचा " द बंगाल फाईल्स" हा चित्रपट पाहिला (विवेक-पल्लवीचे ताश्कन्द फाईल्स आणि काश्मीर फाईल्स नंतर हा चित्रपट पाहायची उत्सुकता होतीच)  आणि त्यातून सादर झालेल्या अनेक प्रसंगातून त्यावेळी काय भयंकर घडलं असेल याच्या नुसत्या कल्पनेनं अंगावर शहारा आला. सिनेमाची अनेक परीक्षणं आली असतील - त्यामुळे परीक्षण नाही पण  काही लिहावंसं वाटलं म्हणून हा प्रपंच ... हा सिनेमा आपल्याला सध्याच्या पश्चिम बंगालमधील राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर  १९४...