पावसाच्या आठवणी
पावसाच्या आठवणी राहुल पावसाच्या धारा अशा सारख्या रिमझिम कधी मुसळधार बरसती पूर नदीला, पूर ओढ्यांना रस्ते ही चिखलमय होती पाने भिजती फुले बहरती धरती निसर्ग न्हाऊन निघती चहुकडे होता पाणीच पाणी बालकांची तर होई पर्वणी शाळा सुटता, फुटायला आता पाटी नाही, दप्तरही आता भिजत नाही पण पावसाची मजा मात्र अजूनही काही कमी नाही चिखलात पाय माखवून जावं वाटे घराकडे साचलेल्या पाण्यात आजही कागदी होडी सोडावी वाटे भिजून जावं अंग सारे मनालाही भिजवून घ्यावे बरसाणाऱ्या पावसात या लहानपण ते पुन्हा जगावे लहानपण ते पुन्हा जगावे ©राहुल लाळे