Posts

Showing posts from August, 2021

कृष्ण ...कृष्णभक्त होणंही सोपं नाही

Image
  * कृष्ण ...कृष्णभक्त होणंही सोपं नाही * राहुल राधा आहे मजसमीप कृष्ण होणं  जमेल का? वाट हरवली जयांची सारथी तयांचा होणं जमेल का? हरवले आभाळ जयांचे त्यांचे छत व्हायला जमेल का? प्राजक्ताच झाडं तू सडा झेलण्यास तुझा अंगण व्हायला जमेल का? सत्य शिव सुंदर तू ध्यास मनी सदा राहील का? कृष्ण बनणं सोपं नाहीच कृष्णभक्त तरी बनणं जमेल का? ©राहुल लाळे चित्रे.... सुचित्रा गोखले, मधुरा आगाशे

रेषा भाग्याच्या

Image
  * रेषा भाग्याच्या * राहुल रेषा भाग्याच्या आता सर्व तुझ्याच आख तू सुखदुःख सारे तुझे,  तुझेच शोध तू बंधनांना साऱ्या आता, तुलाच हद्दपार करायचे मोकळेपणाच्या चष्म्यातून जगाकडे पहायचे रेषेने रेषा जोडायची, हिम्मत तुझीच आहे नजरेनेच काम व्हावे, ताकद तुझ्यात आहे पुरुषाच्या मर्यादा साऱ्या, जाणतेस तूच अमर्याद सीमा  सगळ्या करशील पार तूच रुढी-परंपरा सांभाळून आकाशालाही घालशील गवसणी प्रवास घरसंसाराचाही सारा,  लावशील तू  सत्कारणी स्पर्धा तुझी आता ,आहे फक्त तुझ्याशी झुंज नव्या दमाने देणे , हेच लेणे तुजपाशी उभ्या आडव्या रेषांनी आयुष्य सर्वांचे, सदा सजवलेस  तू असेपर्यंत श्वास आता.. जगावेस  स्वाभिमानाने तू ©राहुल लाळे🌈 १८-०८-२०२१

क्षितिज खुणावते

Image
 क्षितिज खुणावते राहुल छेडिता तारा दुःखाच्या गीतही आर्त उमटते सुखाचे क्षण आठवता हास्य मुखी विलसते फूल  कोमेजून गळले  तरी सुगंध मागे सोडते सुवास तो श्वासात भरता मन अजूनही मोहरते स्मृतीतले चित्र जरी ते हृदयचक्षूत जपायचे अश्रू पुसून आता आयुष्य नवे जगायचे क्षितिजाच्या पलिकडे वाट कुणी पहात आहे आशेचे अंकुर मनात रुजवूनी हासत भेटीस जायचं आहे © राहुल लाळे 🌈 ०३-०८-२०२१