भिकाऱ्यांचा डॉक्टर
*भिकाऱ्यांचा ...भिक्षेकरांचा डॉक्टर...डॉ अभिजीत सोनावणे* राहुल लाळे काल एका अवलियाशी भेट झाली.. आमच्या रोटरी क्लबमध्ये वक्ता म्हणून बोलावलेल्या डॉ अभिजीत सोनावणेंशी. त्यांच्याशी बोलताना कळालं की माणूस कसा बदलू शकतो. अभिजीत लहानपणापासून जरा दबंग वृत्तीचा. दहावीत एकदा नापास झालेला, बारावीत कमी मार्क्स..घरातली प्रतिकूल परिस्थिती ..त्यातून मार्ग काढून हा माणूस डॉक्टर झाला, दवाखाना काढणं शक्य नव्हतं..गावोगावी घरोघरी जाऊन औषधे द्यावी उपचार करावा असं कुणी सुचवलं...पण अंगात चांगले कपडे नाहीत, जे होते ते वडलांचे जुने .. त्यामुळे कोणाकडे गेले तर हा माणूस डॉक्टर आहे यावर कोणी विश्वासंच ठेवायचं नाही. पैसे, मानसन्मान तर राहिलंच पण एखाद्या घरी जाऊन तपासून औषधे दिलीच तर तपासणी साठी माफक ५₹ ही मिळायचे नाहीत. मनात काही बाही विचार यायचे... एके दिवशी अभिजीतला एका गावात एक म्हातारा भिकारी भेटला, त्याला औषध देताना अभिजीतने त्या भिकाऱ्याला काही देऊ केलं तर त्यानंच याला आपली २७₹ ची चिल्लर दिली ..पुढे बोलता बोलता कळालं की म्हातारा कर्नाटकातून आलेला, घरचा धंदा असूनही मुलांनी हाकलून दिलेल...