Posts

Showing posts from February, 2022

२६ फेब्रुवारी...स्वातंत्र्यवीर सावरकर स्मृतीदिन*

Image
 *२६ फेब्रुवारी...स्वातंत्र्यवीर सावरकर स्मृतीदिन* *सावरकर -*जयोस्तुते श्री महान्मंगले* राहुल जयोस्तुते श्री महान्मंगले  शिवास्पदे शुभदे ..स्वतंत्रते भगवती त्वामहं यशोयुतां वंदे .... किती तेजस्वी , चैतन्यदायी स्वातंत्र्यदेवीचे गीत - अजूनही कुठे ऐकू आलं की  स्फुरण चढतं . अशा तेजस्वी, तत्वनिष्ठ , विज्ञानवादी दृष्ट्या स्वातंत्र्यवीराला आज त्यांच्या स्मृतिदिनी शतशः  प्रणाम 🙏🏻 १९१० साली ५० वर्षांची काळ्या पाण्याची शिक्षा भोगायला सावरकर अंदमानला पोचले - एखाद्याने हाय खाल्ली असती पण त्यांना काय सुचलं तर - " मुहिब्बाने  वतन होंगे- हजारो बेवतन पहले फलेगा  हिंद पीछे और भरेगा अंदमान पहले" म्हणजे ... "या माझ्या देशावर प्रेम करणारे असंख्य असतील पण अगोदर त्यांना निर्वासित व्हायला लागेल - हिंदुस्थानाच्या समृद्धीची स्वप्न नक्कीच पूर्ण होतील पण त्यासाठी अंदमान भरीला लागेल " सागराशी एक आगळं  नातं असणारा हा महापुरुष - त्यानं  फक्त मार्सेलिसला जहाजातून उडी मारून कैदेतून निसटण्या साठी फक्त समुद्राची मदत नाही घेतली तर त्याच सागरास " ने मजसी ने परत मातृभूमीला ... सागर...

Statue of Unity

Image
  Visit to Statue of Unity was a life time experience. The way the statue and premises have been set up, is absolutely a state of art creation and the place is out of imagination for any Indian. It's a must visit place...A world beating statue of 182m height and all the Ekta nagar is really developed with articulate planning, design n sincere & serious efforts .  Right from the entry to the museum and a view gallery visit to 45th floor up through the statue to the position where the heart of Sardar Patel 's statue would be, is a life time experience. All the surrounding area was equally beautiful...Cactus garden, Butterfly garden, Ekta Nursery,  Arogya Van, Valley of flowers, laser show ..all are equally awesome The planning - travel arrangements- are extremely metaculate, n eco friendly The stay @ Tent city was also ever remembering The world will have to believe that India can also build world class monuments .   Eifell tower, Burz Khalifa.  ...Be awa...

बैंगनी रंग

Image
 बेरंगी आयुष्य माझे जरी           रंगप्रदर्शन मी भरवंतो  रंगसंगतींंनी भुलावत मी           रसिकांच्या क्षुधेलाही सुखावतो राहुल🌈

रोज डे

Image
मन हवं गुलाबासारखं... राहुल लाळे काट्यासोबत कोमलता बाळगणारं धसमुसळेपणाला ओरखडणारं.. रसिकांची चित्तवृत्ती बहरवणारं विविध रंगात फुलणारं सौंदर्याची बरसात करणारं ललनेचं रुप खुलवणारं गुणांना मान देणारं पाकळ्यांनी रांगोळी सजवणारं हाराची शोभा वाढवणारं मधमाशीला मधु देणारं कवीकल्पनेला साद घालणारं प्रेमात साथ देणारं स्व-अस्तित्व त्यागणारं धुंद सुगंध देणारं गुलकंदातून तोंड गोड करणारं जीवनानंतरही शरीर पवित्र करणारं रंगात रंगून जाणारं * श्री * चरणी अर्पण होणारं मन हवं गुलाबासारखं सगुण सुंदर हसणारं.... यासाठी एकच रोज डे पुरा होईल ? गुलाबासारखं रंगसुगंधी मन *रोज*च राहील असाच रोज डे सर्वांना लाभो या  शुभेच्छा !!! © राहुल लाळे

प्रपोज डे

Image
 आज  म्हणे आहे प्रपोज डे  ....... राहुल लाळे प्रपोज करूया  आज आपण आपल्याच  जुन्या नव्या नात्यांना प्रपोज करूया  आज आपण पुन्हा आपल्या जीवलग मित्रांना  प्रपोज करूया  आज आपण विश्वास आणि श्रद्धेला प्रपोज करूया  आज आपण धैर्य आणि लढाऊ वृत्तीला प्रपोज करूया  आज आपण   जिद्द-निष्ठा आणि स्वाभिमानाला  प्रपोज करूया  आज आपण आपल्या सच्चेपणाला आणि विनयशील वृत्तीला प्रपोज करूया  आज आपण सेवाभावी वृत्तीला आणि दातृत्वाला प्रपोज करूया  आज आपण आपल्यातल्या  माणुसकीला व देवत्वाला प्रपोज करूया आज आपण पुन्हा आपल्या  जीवनसाथीला प्रपोज करूया आज आपण आपल्यातल्याच आपल्याला चला तर मग !!!   ©राहुल लाळे ०८-०२