*भुलेश्वर - एक रमणीय पण अलक्षित जागा * राहुल सहलीला - पर्यटनाला जाताना आपण देशा - परदेशात दूर दूर ठिकाणी जातो पण अनेकदा जवळच्या काही सुंदर ठिकाणांना भेट द्यायला विसरतो . तसंच काहीसं माझं झालं . इतक्या ठिकाणी जाऊन आलो पण यवतजवळील भुलेश्वरबद्दल अनेक वर्ष ऐकूनही कधी गेलो नव्हतो . दिवाळीच्या मुहूर्तावर मात्र परवा सकाळी भुलेश्वरला जायला निघालोच . GPS ने कात्रज - कोंढवा - बोपदेव घाट - सासवड रस्ता सांगितलं म्हणून तिकडून गेलो . देहूरोड - कात्रज बायपास आणि कात्रज - कोंढवा रस्त्यावरही काम चालू असल्यामुळे ट्रॅफिक लागला . बोपदेव घाट चढून गेल्यावर बोपदेव माचीवर " लोणकर वाड्यावर " ब्रेकफास्टसाठी थांबलो मस्त मिसळ - इडली - चहा झाला आणि पुढे निघालो . या रस्त्याला ट्रॅफिक फारसा नाही पण रस्ता अरुंद असल्यामुळे स्पीड कमी ठेवायला लागतो . त्यामुळे सासवडवरून माळशिरस - भुलेश्वरला जायला थोडा वेळ लागला . कमानीतून आत गेल्यावर छोट्या घाटरस्त्याने कार वर ...