शिक्षक दिन
*सर्वच माझे शिक्षक*
राहुल
शिकवणारे अनेक मिळाले
अनेक जण असेच
काहींना मी निवडले
काहींनी मला निवडले
काहींकडे नकळत शिकलो
बघता बघता बरंच समजलो
काहींना कळले मी शिकतोय
नुसताच पाहून...
काहींना बरेच प्रयत्न पडले
काय करायचे, काय नाही
काय धरायचे, काय सोडायचे
कसं वागायचं, कसं बोलायचं
कसं पहायचं, कसं चालायचं
कसं समजून घ्यायचं, कसं समजवयाचं
माणूस म्हणून कसं जगायचं
काहींना समाधान त्यांच्या कमाईत
काहींना माझ्या प्रगतीत
बरंच शिकत गेलो ...
शिकवतही गेलो
शिकवणारे मिळतच गेले...
आणि काही शिकणारेही
ज्या सर्वांकडून शिकलो..
शिकत राहीन...
अशा सर्वच शिक्षकांना
सादर प्रणाम
*शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा*
© राहुल लाळे
०५-०९-२०१९

Comments
Post a Comment