ऑप्शन...पर्याय

 https://youtu.be/odh8naCj85M


सकाळी कुठंतरी वाचलं आणि *ऑप्शन*  ही शॉर्टफिल्म

पाहिली... 

फक्त ९-१० मिनिटांची फिल्म..पण सुनील बर्वे आणि मृणाल कुलकर्णी यांनी किती किती छान व्यक्तता प्रदर्शित केलीय...


सुचलेल्या चार ओळी...


*ऑप्शन - पर्याय*

राहुल


प्रत्येक जण एक पर्याय शोधतो


अगदी लहानपणासून प्रत्येक गोष्टीत

हा नाही तर तो पर्याय आहेच


शोधतो कोणी  कोणते विषय घ्यायचे त्याचा  पर्याय

कोणी परीक्षेत दिलेल्या प्रश्नांपैकी कोणता सोडवायचा  तो पर्याय


शिक्षण झाल्यावर मिळालेल्या अनेक संधीत 

आपण स्वीकारतो तो एक पर्याय


कमावते झाल्यावर काय करायचं, कुठं जायचं त्याचे पर्याय


एकटं राहायचं का दुकटं व्हायचं हाही पर्यायच

मग अनेकांपैकी एक निवडणं ...


आपल्याला आवडणारं का पालकांना .. हा एक मोठा पर्याय


तो निवडला की मग

नातं निर्माण होतं 


आपण एकमेकांचे पर्याय होतो

किंवा दाखवतो तरी तसं ….


पण नात्यात गरजेला पर्याय कोणता ?


गरज एकट्याला असून चालत नाही

ती दोघांनाही हवीच


कारण भाळणं संपलं  की पर्याय फक्त सांभाळणं

आणि ते जमलं की ..मग जीवन जगण्याचे अनेक पर्याय


कधी जवळ राहून, तर कधी दूर राहून


मनात नातं जपणं मात्र महत्वाचं

त्याला  पर्याय नाही ...


©राहुल लाळे🌈

Comments

Popular posts from this blog

धुरंधर

द बंगाल फाईल्स

नोव्हेंबरमधील धार्मिक पर्यटन .. गिरनार - सोमनाथ - द्वारका