Posts

Showing posts from December, 2022

श्रद्धा आणि विश्वास

Image
 *श्रद्धा  आणि  विश्वास*   राहुल लाळे ०४-१२-२०२२ *श्रध्दा* राहुल घरी आता परत ती येणार नाही कधी मायबापाच्या आठवणीतून मात्र जाणार नाही कधी पणती, दिवा लावतील आता  सारे तिच्यासाठी मशाल घेऊन उठा मित्रहो अन्य बहिणींसाठी नराधम तो सुटू नये म्हणून आवाज चला उठवूया आसपास असतील बहिणी त्यांना सावधान  करूया गेल्या आठवड्यात श्रद्धा वालकर या तरुणीचा तिच्या लिव्ह इन पार्टनर आफताबने खून केल्याची बातमी ऐकली , अनेक उलटसुलट  भयंकर बातम्या ऐकल्या आणि  अस्वस्थ झालो … श्रद्धाच्या देहाचे   ३५ तुकडे करून घरातल्या फ्रीजमध्ये ठेवून नंतर  क्रूरकर्मा आफताबने दिल्लीत -मैहरोलीत वेगवेगळ्या ठिकाणी ते टाकून विल्हेवाट लावली - आणि हे प्रकरण बाहेर आले सहा महिन्यानंतर -  आणि नंतर अनेक जण आपापल्या परीने - कुवतीने -समजुतीनुसार- इच्छेनुसार - आणि भूमिकेनुसार  या घटनेबद्दल वृत्तवाहिन्यांमधून - वृत्तपत्रांमधून - सोशल मीडियामधून आणि प्रत्यक्ष चर्चेतून व्यक्त होत आहेत.  एखाद्या मुलगी किंवा स्त्री विनयभंग,बलात्कार - सामूहिक बलात्कार, एकतर्फी प्रेमातून केलेली ह...