सागर किनारा
उंच ताड माड, डौलदार झाडे
पोफळी,सुपारी ...डोलतात वेडे
निळ्याशार लाटा, अथांग क्षितिज
दूरवर तिथे ... एक विहारे जहाज
मंद मंद वारा, निसर्ग साजिरा
खुणावतो मज , हा सागर किनारा
फेसाळत्या लाटा, मन होई दंग
हळूच पाय टाकता...उठती तरंग
ऊंच आकाशात... विहग उडतो मजेत
निळाई अथांग...वाटे घ्यावी कवेत
सृष्टी निसर्गरम्य, डोळ्यात मावेना
परतीची वाट, धरावी वाटेना....
©राहुल लाळे

Comments
Post a Comment