वाट आपली आपली




 वाट आपली आपली


वाटा तशा अनेक

काही सरळ, काही वाकड्या

काही नागमोड्या,  काही चढ-उताराच्या

तर काही वाटा निसरड्याही..

काही वाटा अंधाराच्या

काही लख्ख प्रकाशवाटा

काही रहिवाटीच्या, काही अगदीच गुप्त तळघरातल्या..

काही वाटा फ़ुटतात, काही हरवतात, 

काही वाटा मिळतात, काही सापडतात.

 वाट कधी पाहिली जाते, 

तर कधी वाट दाखवली जाते, 

अन वाट लावलीही जाते. 

कधी कधी आपल्या आपण वाट लागतेही.

अनोळखी वाटा अनेकदा चोखाळल्या जातात

कधीतरी त्या  जोखल्याही जातात

कधी प्रवासात वाटा वेगळ्या होतात

कधी वाट वाकडी करुन येणजाणं होतं

अन कधी वाकड्या वाटेला जाण ही होतं. 

कुणी आपापल्या वाटेने जात असतो, 

कुणास वाट दाखविणारा भेटतो, 

तर कुणी वाट अडविणारा असतो. 

कुणी वाट राखतो, कुणी वाट मारी करतो. 

कधी कधी  एखाद्या वाटेला जायच नसतं..

सरळ वाटेला धरुन कधी चालायचं असतं

तश्या अनेक वाटा तुम्ही आम्ही खुप पाहिलेल्या असतात

 पण स्वत:ची अशी एखादी वाट असतेच...नाही का? 


माझी ही आहे..अशीच एक पाऊलवाट !!!


आणि तुमची?


राहुल लाळे

२३-०९-२०२०

Comments

Popular posts from this blog

धुरंधर

द बंगाल फाईल्स

नोव्हेंबरमधील धार्मिक पर्यटन .. गिरनार - सोमनाथ - द्वारका