*पानगळ*
*पानगळ*
राहुल
पानगळ जरी झाली
तरीही झाड परत बहरते...
फुलंफळं लुटली जाऊनही
खोडाला पुन्हा पालवी फुटते...
आपणही का नाही मग झाड व्हावं ?
आप्तजनांची पानं गळता
हुंदके गिळून नवा बहर ल्यावा....
आशेची पालवी नेसावी
आठवणीतून नवस्वप्ने पहावी
छायेत आपल्या इतरांनाही सावली द्यावी
सारी दुनिया खुलवून टाकावी....
© राहुल लाळे

Comments
Post a Comment